- चैतन्य ज्योतिष मंडळाचे पुरस्कार जाहीर

- चैतन्य ज्योतिष मंडळाचे पुरस्कार जाहीर

४० (पान २ साठी)

-rat२p३५.jpg-
९९९९७
दीपाली गुरव, डॉ. विकास खिलारे, उज्ज्वल पावले
--
चैतन्य ज्योतिष मंडळाचे पुरस्कार जाहीर

रविवारी वितरण ; दीपाली गुरव, पावले, डॉ. खिलारे यांचा समावेश

रत्नागिरी, ता. २ ः श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे एकदिवशीय ज्योतिष संमेलन व वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. ७) आयोजित केला आहे. यंदाचा पद्मश्री पुरस्कार कुडाळच्या ग्रहसंकेतच्या संस्थापिका दीपाली गुरव, कार्यगौरव पुरस्कार वेदचक्षू ग्लोबचे संस्थापक उज्ज्वल पावले आणि चैतन्यभूषण पुरस्कार साताऱ्याच्या संजीवनी मंडळाचे संस्थापक डॉ. विकास खिलारे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्याला पं. विजय जकातदार, ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, अॅड. मालती शर्मा, विजयशास्त्री संगमुळे, प्रिया मालवणकर, राधेश पाटील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी सकाळी ८.३० ते सायं. ६.३० या वेळेत जे. के. फाईल्स येथील साईमंगल कार्यालयात होणार आहे.
सकाळी अॅड. डॉ. मालती शर्मा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर विजय जकातदार व्याख्यान देतील. ११.४५ वा. स्वागत समिती सत्कार डॉ. प्रसन्न मुळ्ये यांच्या हस्ते होणार आहेत. १२.१५ वा. प्रिया मालवणकर यांच्या अध्यक्षतेखाली मुखचर्याशास्त्र पदवीदान व पुस्तक प्रकाशन कुलगुरू विजयशास्त्री संगमुळे यांच्या हस्ते होईल. दुपारी २ वा. नंदकिशोर जकातदार यांच्या अध्यक्षतेखाली वक्तृत्व स्पर्धा, दुपारी ३.३० वा. राधेश पाटील यांच्या हस्ते आजीव सदस्यांचा सत्कार, दुपारी ४ वा. कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर पदवीदान कार्यक्रम होईल. ४.३० वा. पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. ज्योतिषप्रेमी व रत्नागिरीकरांनी या संमेलनात भाग घ्यावा, असे आवाहन श्री. चैतन्य ज्योतिष मंडळाच्या कार्याध्यक्ष विवा साठे, सचिव डॉ. चंद्रकांत वाघुळदे, उपाध्यक्ष मधुरा चिंचळकर यांनी केले आहे.


यावर होतील व्याख्याने
संमेलनात ओंकार कुलकर्णी (प्रेमविवाह), गौतम ब्रह्मे (शिक्षण योग), शुभांगिनी पांगारकर (परदेश गमन), विनोद शर्मा (नोकरी, व्यवसाय), उज्ज्वला शिरसाट (कुंडली कशी पाहावी), पल्लवी साखरे (कर्मस्थान), उमा जोशी (लग्नेशाचा भावविचार), विजय गुरव (मंगळ), प्राची मलमकर (चतुर्थ स्थान व वास्तुयोग), भरत सटकर (कपाळ व कपाळावरील रेषा), मीनल ठोसर (डोळे), स्मिता मुळे (वैवाहिक सौख्य), सुप्रिया भारस्वाडकर (अवकहडा चक्र) या विषयांवर व्याख्याने देणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com