जायंट्स फाऊंडेशनचे कांदळवन लागवडीचे कार्य स्तुत्य

जायंट्स फाऊंडेशनचे कांदळवन लागवडीचे कार्य स्तुत्य

४२ (पान २ साठी)


-rat२p१३.jpg-
९९९२१
बोलताना डॉ. श्रीरंग कद्रेकर. डावीकडून संजय पाटणकर, डॉ. मिलिंद सावंत, सीए भूषण मुळ्ये आदी.
-------------
कांदळवन लागवडीचे कार्य स्तुत्य

डॉ. कद्रेकर ; जायंट्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी सीए भूषण मुळ्ये

रत्नागिरी, ता. २ : जनसेवा हीच इश्वरसेवा आहे. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन व ग्रुपचे विविध समाजोपयोगी कार्यक्रम, उपक्रम कौतुकास्पद आहेत. तसेच येथे शपथ व पदग्रहण सोहळ्यात हात जोडून शपथ घेतली जाते म्हणजे भारतीय संस्कृतीनुसारच कामकाज चालते याचा आनंद वाटला. जायंट्स ग्रुप कांदळवन लागवडीसाठी प्रयत्न करत आहे, ही सर्वांत उत्तम व निसर्गाच्यादृष्टीने महत्वाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी केले.
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशनच्या (२ ड) अध्यक्षपदी निवड झालेले सीए भूषण मुळ्ये व पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पदग्रहण समारंभ हॉटेल व्यंकटेश येथे झाला. त्या प्रसंगी डॉ. कद्रेकर बोलत होते. या वेळी फाउंडेशनचे स्पेशल कमिटी मेंबर डॉ. मिलिंद सावंत, माजी अध्यक्ष विनायक राऊत आणि संजय पाटणकर, कार्यवाह राजेश गांगण आदी उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांनी, जायंट्स ग्रुपतर्फे समाजात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. कार्यक्रमांची संख्या वाढवताना ग्रुपची सदस्य संख्याही वाढवली जाणार आहे. ग्रुपच्या नवीन शाखा पुढील वर्षभरात वाढण्याकरिता विशेष मेहनत घेणार असल्याचे सांगितले. डॉ. मिलिंद सावंत यांनी सांगितले, कोरोना काळामुळे ग्रुपचे काम थांबले होते. आता नव्याने पुन्हा उपक्रम सुरू होत आहेत. रत्नागिरीत महिलांसाठी प्रसाधनगृहांची कमतरता आहे. याकरिता ग्रुपच्या माध्यमातून प्रसाधनगृह उभारणीसाठी प्रयत्न आहे. माजी अध्यक्ष विनायक राऊत व संजय पाटणकर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी गेली १८ वर्षे कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कलाविषयक अनेक कार्यक्रम संस्थेने राबवले आहेत. या प्रसंगी जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी, कारवांचीवाडी, संगमेश्वर आणि काजिरभाटी तसेच सिटी सहेली, मनकर्णिका सहेली, कुवारबाव सहेली, कारवांचीवाडी सहेली या ग्रुपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा झाला. युनिट संचालक प्रतिभा प्रभुदेसाई व पूनम नाळकर यांच्या अधिपत्याखाली शपथ घेण्यात आली. सूत्रसंचालन अनुया बाम यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com