रत्नागिरी अध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी अध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन

rat२p४१.jpg-
०००२४
अॅड. दीपक पटवर्धन
----------------
स्वरूपानंद पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी दीपक पटवर्धन
रत्नागिरी, ता. २ः राज्य कार्यक्षेत्र असलेल्या स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची फेरनिवड झाली. ११ संचालक बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.
राज्य कार्यक्षेत्र असलेल्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याने अॅड. दीपक पटवर्धन, माधव गोगटे, जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, प्रदीप कुलकर्णी, अजित रानडे, शरदचंद्र लेले, राजेंद्र सावंत, मधुरा गोगटे, मानसी बापट आणि संतोष प्रभू हे ११ संचालक निवडून आले आहेत. संचालक मंडळात संतोष प्रभू हे नवे संचालक समाविष्ट करण्यात आले असून (कै.) अरविंद कोळवणकर यांच्या जागी त्यांची निवड झाली आहे.
मार्चअखेर संस्थेच्या १० शाखांची वसुली १०० टक्के झाली आहे. एकूण २२ हजार ५५६ कर्जदारांपैकी केवळ ४० कर्जदार थकित राहिले आहेत. संस्थेचा नेट एनपीए शून्य टक्के ठेवण्यात संस्थेला यश मिळाले. आर्थिक वर्षात संस्थेचे येणे कर्ज १८२ कोटी रुपये असून गतवर्षीपेक्षा १२ कोटींची वाढ एकूण कर्ज व्यवहारात झाली. ठेवींमध्येही १५ कोटींची वाढ झाली असून, वर्षअखेरीला २६५ कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेकडे ७६ हजार ५२७ ठेवीखात्यांचे माध्यमातून जमा आहेत. गुंतवणूक १३१ कोटी रुपयांची असून, संस्थेचा स्वनिधी ३७ कोटी इतका झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला ६ कोटी ६१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी ४० लाखांनी नफा वाढला आहे.

चौकट
नवीन सुविधा
पतसंस्थेची सभासद संख्या ४२ हजार २५० आहे. नवीन आर्थिक वर्षात ५ नव्या शाखा नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ३०० कोटींचा ठेवटप्पा पार करताना २०० कोटींचा कर्जटप्पा पार करत संस्थेचा संमिश्र व्यवसाय ५०० कोटी पार करण्यासाठी नव्या आर्थिक वर्षात प्रयत्न केले जातील. कर्जमर्यादेत वाढ करणार, क्यूआर कोड सुविधेसह अन्य डिजिटल बँकिंग सुविधा मर्यादित स्वरूपात सुरू करणार आहोत. पावस आणि चिपळूण येथे संस्थेच्या स्वमालकीचे कार्यालयाचे स्वप्न या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पूर्ण होईल, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com