देवगडात १८१ प्रकरणे निकाली

देवगडात १८१ प्रकरणे निकाली

०००४६

देवगडात १८१ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालत; ९८ लाख रुपये वसुली

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ ः येथील दिवाणी न्यायालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा एकूण सुमारे १३१२ प्रकरणांपैकी एकूण १८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून सुमारे ९८ लाख ३३ हजार ५२ रूपये इतकी वसुली झाली.
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व ओरोस येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर- येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. बी. वाळके यांच्या हस्ते झाले. तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यावेळी देवगड तालुका वकिल संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. देवानंद गोरे, अ‍ॅड. अविनाश माणगावकर, अ‍ॅड. प्रकाश बोडस, अ‍ॅड. लक्ष्मीकांत नाथगोसावी, अ‍ॅड. इंद्रनील ठाकुर, अ‍ॅड. कौस्तुभ मराठे, अ‍ॅड. प्रसाद करंदीकर, अ‍ॅड. अभिषेक गोगटे, अ‍ॅड. आशिष लोके, अ‍ॅड. आरती खाडीलकर, अ‍ॅड. मैथिली खोबरेकर, अ‍ॅड. संगीता कालेकर, अ‍ॅड. सिद्धेश माणगावकर यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नीलेश जगताप व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते. या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील एकूण २६६ दावे ठेवण्यात आले होते. त्यातील ५२ खटले निकाली काढण्यात आले. यातून सुमारे ८६ लाख ५८ हजार २८ रूपये इतकी वसुली झाली.
तर बँक, दूरसंचार विभाग, ग्रामपंचायत विभाग, नगरपंचायत, महावितरण यातील १०४६ इतकी वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील १२९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून एकूण सुमारे ११ लाख ७५ हजार २४ रूपये इतकी वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून अ‍ॅड. प्रसाद करंदीकर यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com