मुरादपूरला आपला दवाखाना सुरू

मुरादपूरला आपला दवाखाना सुरू

rat2p42.jpg-
00037
रत्नागिरी : खेडशी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करताना बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक रमेश गायकवाड.
-------------
खेडशी व्यायामशाळा येथे ध्वजवंदन
रत्नागिरी : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लक्ष्मीनारायण नगर, एकता नगर व गणेश नगर रहिवासी संघाच्यावतीने खेडशी व्यायाम शाळेच्या भव्य मैदानात नगरातील रहिवासी संघाचे कार्यकारणी सदस्य व बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक रमेश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदन सोहळ्यानिमित्त नगरातील ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, लेखक व इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. दत्ता पवार यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. रहिवासी संघाचे अध्यक्ष श्री. पालव यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. खेडशी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री. पाटील हे विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. सोहळ्यासाठी ध्वजस्तंभाला येणारा सर्व खर्च श्री. गायकवाड यांनी केल्याने त्यांचे रहिवासी संघाचे अध्यक्ष श्री. पालव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रेश्मा कांबळे यांनी केले.
------------
पूर्णगडमध्ये विकासकामांबाबत माहिती
पावसः पूर्णगड येथे विकासकामाबाबत सरपंच धानबा यांच्या अध्यक्षतेखाली गावचा विकास करण्यासंदर्भात शासकीय कामाची माहिती देण्यात आली. तसेच गावातील अन्य समस्यांचे निवारण कसे करता येईल याबाबत चर्चा झाली. सद्यःस्थितीत रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यावर सखोल चर्चाविनिमय करून कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बशिर मुर्तूझा, तालुकाप्रमुख राजन सुर्वे, विभाग अध्यक्ष संतोष पोकडे, ठाकरे गटाचे पावस विभागप्रमुख किरण तोडणकर, सरपंच प्रेमा धानबा, सुभाष धानबा, मोहल्ला कमिटीचे खलील हातोडकर, नासीर गावखडकर, अश्रफ सारंग तसेच मोहल्ला कमिटिचे सदस्य उपस्थित होते.
----------
ratchl23.jpg
99950
चिपळूणः मुरादपूर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन करताना आमदार शेखर निकम, सदानंद चव्हाण, प्रशांत यादव आदी.
-----------
मुरादपूरला आपला दवाखाना सुरू
चिपळूणः राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चिपळूण शहरातील मुरादपूर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. सोमवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आमदार शेखर निकम यांच्या हस्ते तर माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात अशा एकूण ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी चिपळूण शहरातील आराध्य अपार्टमेंट, अमेय नगर, मुरादपूर येथे या दवाखान्याचा आरंभ करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे नेते व उद्योजक प्रशांत यादव, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार प्रवीण लोकरे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे, माजी नगरसेविका संजीवनी, माजी नगरसेवक करामत मिठागरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरी आरोग्य केंद्र चिपळूण कर्मचारी, आरोग्यवर्धिनी केंद्राचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. आपला दवाखाना येथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एमबीबीएस डॉक्टरसह परिचारिका, आरोग्यसेवा येथे कार्यरत असणार आहे.
---------------------
ratchl25.jpg
99956
चिपळूणः योगासनाचे धडे घेताना एसपीएम शाळेतील विद्यार्थी.
------------
एसपीएम शाळेत निसर्ग विज्ञान कार्यशाळा
चिपळूणः सेवासाधना प्रतिष्ठानतर्फे परशुराम येथील एस. पी. एम शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेली दोन दिवसीय निसर्ग विज्ञान कार्यशाळा उत्साहात झाली. कार्यशाळेत संदीप भाटिया व नागेश नांगी यांनी विद्यार्थ्यांना योगासन, व्यायामाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांकडून व्यायामाचे अनेक प्रकार करून घेतले. विनित वाघे यांनी विश्वाची निर्मिती व जीवसृष्टी आणि मानवाची उत्क्रांती या विषयावर मार्गदर्शन केले तसेच या विषयाला अनुसरून गटचर्चा घेण्यात आली. निसर्गमित्र सोहम घोरपडे आणि मंगेश गोवेकर यांनी जंगल वाचन पक्ष्यांचे, झाडांचे निरीक्षण करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना परशुराम येथील डोंगरमाथा सफारीचा अनुभव दिला. विद्यार्थ्यांना रात्री दुर्बिणीद्वारे आकाशदर्शन करण्याची संधी मिळाली. चंद्र, मृगनक्षत्र, सप्तर्षी यांचे निरीक्षण केले. दुसऱ्या दिवशी लीना नांगी यांनी आहार आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. वाघे यांनी जर्नी ऑफ सायन्स या आपल्या व्याख्यानामार्फत विज्ञान या विषयाचे आपल्या जीवनातील स्थान, या विषयाचे महत्व सांगितले. युनिव्हर्सल कॉन्सेप्ट ऑफ धर्म या विषयावर संदीप भाटिया यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना असे शिबिर दरवर्षी व्हावे, अशी मागणी मुख्याध्यापिका आरती खाडिलकर यांच्याकडे केली.
------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com