देवगड हायस्कूलमध्ये
शालेय साहित्य वाटप

देवगड हायस्कूलमध्ये शालेय साहित्य वाटप

०००५५

भराडी देवी सेवा मंडळातर्फे
रिद्धी सिद्धी ट्रस्टला मदत
मालवण ः भराडी देवी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र रुपेश दूखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काहीतरी चांगले काम करण्याच्या हेतूने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आदी वस्तू जमा करून ही सर्व मदत मुंबई ऐरोली येथील रिद्धी सिद्धी ट्रस्ट येथे देण्यात आली आहे. भराडी देवी सेवा मंडळाचा अनाथ मुलांसाठी छोटीशी मदत हा कार्यक्रम रिद्धी सिद्धी ट्रस्ट,ऐरोली येथे नुकताच पार पडला. यासाठी असंख्य दानशुर हातांनी सढळ हस्ते मदत केली. यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश लोखंडे यांनी सांगितले की, ज्यांनी आमच्या मंडळावर विश्वास ठेवून जी वस्तु किंवा रोख रक्कमेच्या माध्यमातुन मदत केली त्या सर्वाचे आभार आणि यापुढे अशाच प्रकारच्या निराधार लोकांसाठी, अनाथ मुलांसाठी जास्तीत जास्त आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली जाईल. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष कृष्णा चौगुले, सचिव संभाजी कणसे, खजिनदार देवेंद्र चव्हाण, सल्लागार दिनेश बांबळे, अमोल दळवी, महेश साटम, गिरीश चिंदरकर, सतीश दुखंडे, शुभम कणसे, अरविंद घोगळे, ओमकार चव्हाण, संतोष साटम, चेतन परब तसेच मंडळाच्या महिला आणि लहान मुलांची उपस्थित होती. भराडी देवी सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीही विविध निराधारांना अनेक अनाथ आश्रमांना अशा प्रकारची मदत केली आहे.
-----
00068
देवगड ः येथील हायस्कूलमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करताना चं. स. शिंगाडे, मुख्याध्यापक संजीव राऊत, स्वाती पाटणकर, शीतल वैशंपायन.

देवगड हायस्कूलला शालेय साहित्य
देवगड ः येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या १९९७-९८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्याचा १० विद्यार्थ्यांना लाभ झाला. यावेळी मुख्याध्यापक संजीव राऊत, संस्था पदाधिकारी चं. स. शिंगाडे, शीतल वैशंपायन, केदार पालकर, स्वाती पाटणकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. श्री. राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल कौतुक करून अशा प्रकारचे उपक्रम इतरही माजी विद्यार्थ्यांनी घ्यावेत, असे आवाहन केले. या शैक्षणिक साहित्यासाठी शीतल वैशंपायन, माधवी वातकर, प्राची आरेकर, लीना चोपडेकर, हितेश पटेल, प्रफुल्ल पटेल, केदार पालकर, प्रसाद मालवणकर, चेतन प्रभू, तुषार पवार, श्रेयस कुबल या माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक सहाय्य केले.
---
अपहारप्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता
सावंतवाडी ः कोनाळकट्टा येथील पोस्टात तब्बल १ कोटी १० लाख ८२ हजाराचा आर्थिक अपहार प्रकरणी आरोप असलेल्या चौघा जणांची येथील जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. सुरेश वासुदेव बांदेकर, हनुमंत शंकर धुरी (दोघे रा. कोनाळकट्टा-बांदेकरवाडी ता. दोडामार्ग), मानसी नीलेश गंगावणे (रा. भटवाडी वेंगुर्ले), रमेश रामराव वाघुलकर (रा. विद्यानगर-परळी, जि. बीड) अशी त्यांची नावे आहेत. याकामी अ‍ॅड. संग्राम देसाई, अनिल निरवडेकर, गणेश चव्हाण, अश्पाक शेख यांनी काम पाहिले. याबाबत अधिक माहिती अशी, १ डिसेंबर २०१५ ला हा अपहार उघड झाला होता. यात कोनाळकट्टा पोस्टात तब्बल एक कोटी दहा लाख ८२ हजाराचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी ग्राहकाने तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण पुढे आले होते. याबाबतची तक्रार तत्कालीन पोस्टाचे अधिकारी अर्जुन इंगळे यांनी दिली होती. त्यानुसार या चौघांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यांना अटक करून पुढील कार्यवाही करण्यात आली होती. हा खटला येथील जिल्हा न्यायालय सुरू होता़ मात्र, सबळ पुराव्याअभावी चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com