व्यवसाय पिठं आणि प्रिमिक्सचा

व्यवसाय पिठं आणि प्रिमिक्सचा

धरू कास उद्योजकतेची..............लोगो

rat२p४७.jpg ः
०००८९
प्रसाद जोग

इंट्रो
गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत रोजच्या आहारात लागणारा महत्वाचा पदार्थ म्हणजे (आटा) पिठे. पीठ आणि प्रिमिक्सचा व्यवसाय - ग्रामीण भागातूनसुद्धा करता येऊ शकतो व शहरी भागात किंवा लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागात तसेच नोकरपेशा वस्ती जास्त प्रमाणात असणाऱ्या ठिकाणी सुद्धा विविध प्रकारची ताजी, गुणवत्तापूर्ण पिठे व प्रिमिक्सेस विक्रीस उपलब्ध करून देऊन तो सुरू करता येऊ शकतो. तसेच शहरी भागात मोक्याच्या ठिकाणी आटाघरही चालवता येऊ शकते. नोकरदार वर्गाला व्यस्त वेळापत्रकामुळे व गिरणीतील गर्दीमुळे धान्य दळून आणायला शक्य होत नसे. याचा फायदा संधी शोधक उद्योजकांनी घेऊन आकर्षक पॅकेजिंग केलेले हवाबंद, पिशवीबंद पीठ होलसेल व रिटेल विकायला सुरवात केली होती. त्यात काही ब्रँड्स विकसितही झाले; पण त्याचा फटका हा छोट्या गिरण व चक्की व्यावसायिकांना पडायला सुरवात झाली होती. त्यातून काहींनी आपल्या गिरणी विकून टाकल्या तर काहींनी अन्य व्यवसायधंद्याची वाट धरली. त्यामुळे काही ठिकाणी मागणी असूनही पीठ पुरवठा होऊ न शकल्याने व स्वतः विकत घेतलेल्या पिठाच्या चक्कीवर दळण नीट न दळता आल्यामुळे गृहिणींची भिस्त पुन्हा ब्रँडेड पिठं, आटा यांवरच अवलंबून राहिली होती. बचतगटांनाही घरगुती घरघंटी दिल्या गेल्या होत्या; पण ग्राहकांना नक्की काय हवे आहे याचा अंदाज न आल्यामुळे व त्या व्यवसायातील व्यापामुळे मोठे महिलाउद्योगही नावारूपाला आल्याचे दिसून आले नाही. पुढे या विषयात नवउद्योजक अनास्था दाखवू लागले; पण स्वतःच तंत्र विकसित करून स्वतः ची पिठाची विस्तृत श्रेणी विकसित करून धंद्यात परिस्थितीप्रमाणे बदल करणारे उद्योजक ग्राहकांच्या अभिरूचीचा अंदाज घेत या स्पर्धात्मक व्यवसायात आपला जम बसवत गेले.
- प्रसाद जोग, चिपळूण
---
व्यवसाय पिठं आणि प्रिमिक्सचा....
सदरात आपण किफायतशीर ठरत असलेल्या पिठांच्या उद्योगासंदर्भात विस्तृत माहिती पाहणार आहोत. यात आपण महिलाउद्योग, गृहोद्योग, प्रोप्रायटरी उद्योग व आटाघर यांच्या बिझनेस मॉडेलवर व त्यांच्या यशस्वीतेवर प्रकाश टाकणार आहोत. सध्या प्रचंड मागणी असलेली उत्पादने म्हणजे लोकवन व सिहोर गव्हाचे पीठ, ज्वारी, बाजरीचे, शाळूचे पीठ, नाचणीचे पीठ, बेसन पीठ, कुळीथ पीठ, मोदक पीठ, वड्याचे पीठ, आंबोळी, घावन आणि थालिपीठ, मेतकूट, मिक्स भाकरीचे पीठ, मक्याचे पीठ, उपवास भाजणी पीठ, अनारसे पीठ, शंकरपाळे, बोरं यांचे पीठ, शिरा, उपमा, पोहे, गुलाबजाम, मंच्युरियन मिक्स, टोमॅटो आम्लेट, भजीमिक्स वैगरे ही आहेत. पीठ व्यवसायाचे मॉडेलः संस्कृती उत्पादने महिला गृहोद्योग उद्योजिका भावना भरत आंबेटकर (सावर्डे, चिपळूण) व्यवसाय क्षेत्र महाराष्ट्र, उद्देश महिला सक्षमीकरण. उत्पादनं - पिठे, लोणची, प्रिमिक्स.
२५ नोव्हेंबर २०२१ ला महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील २५ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात संस्कृती उत्पादनेच्या संचालिका म्हणून भावना आंबेटकर यांनादेखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिला आत्मनिर्भर व्हाव्यात व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांना उद्योजकतेची गोडी लागावी म्हणून संस्कृती उत्पादने महिलांना त्यांच्या भागात विक्रीसाठी भावनाताईंनी उपलब्ध करून दिली आहेत. महाराष्ट्रात स्वयंसिद्ध उद्योगिनी या पिठं विक्री व्यवसायातून घडत आहेत. त्यांची उत्पादने पारंपरिक चवीची हमी देणारी आहेत. खाताव ः उद्योजक ः श्री वैभव दत्तात्रय काटदरे, कंपनी ः पूर्णान्न फूडस्, ब्रॅण्ड ः खाताव (सावर्डे, चिपळूण), व्यवसाय क्षेत्र (कल्याण, डोंबिवली, ठाणे.) उद्देश ः स्वयंरोजगार, स्थानिकांना रोजगार व ब्रॅण्ड निर्मिती उत्पादनं - पिठे, लोणची, प्रिमिक्स, पापड, उपवास भाजणी. वैभव काटदरे व त्यांच्या पत्नी दक्षता यांनी खाताव हा ब्रॅण्ड विकसित केला असून, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार उत्पादने आपल्या चोखंदळ व खवय्ये असणाऱ्या ग्राहकांना विविध प्रदर्शनातून व त्यांच्या वितरकांमार्फत उपलब्ध करून देतात. या व्यवसायाची सुरवात त्यांनी छोट्या स्वरूपात गृहोद्योग म्हणून केली होती. दर्जेदार उत्पादने बाजारात आणत असताना ग्राहकांनी दाखवलेला विश्वास यामुळे खाताव हा ब्रँड विकसित होत असून, जनमानसामध्ये लोकप्रिय होत आहेत. वैभव यांच्या मते, या उद्योगात यशस्वी होण्यासाठी उच्च गुणवत्ता व ग्राहकांच्या अभिरूचीचा सातत्याने विचार करायला लागतो.
चिपळुणातील उद्योजिका प्रो. प्रा. आरती खेडेकर यांचा ब्रॅण्ड आहे. आटाघर, स्वयंरोजगार, नावीन्य जपणारा महिला गृहोद्योग, लोकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठीं कोरोना काळातील धाडस केले. पिठे, चक्की फ्रेशआटा सेवा त्या देतात. श्री. व सौ. संदीप खेडेकर यांनी चिपळूण येथील पाग येथे आटाघर सुरू केले असून, घरपोच पीठ, आटा यांचा पुरवठा केला जातो. व्हॉट्सअॅपवरून ऑर्डर्स स्वीकारल्या जात असल्यामुळे ग्राहकांना हवे तेव्हा फ्रेश आटा मिळतो. आटाघर शुद्धता, विश्वासार्हता, गुणवत्ता या त्रिसुत्रीवर चालते. आपल्या ग्राहकांना शुद्ध, पौष्टिक, ताजे, स्वच्छ, आरोग्यदायी पिठे मिळावीत म्हणून निवडक धान्य कराड, कोल्हापूर येथून खरेदी करून चक्की फ्रेश आटा ग्राहकांना माफक दरात घरपोच पोहोचवला जातो.
(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com