क्राईम

क्राईम

२५ (पान ३ साठी)

स्वप्नाली सावंत खूनप्रकरणी
संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी ः रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत हिच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयिताचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. छोटा भाई उर्फ रूपेश कमलाकर सावंत (वय ४३, रा. सडामिऱ्या रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार ३१ ऑगस्ट २०२२ ला घडला होता. स्वप्नाली सावंत या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार भाई सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांच्या तपासात १ सप्टेंबरला स्वप्नालीचा पती सुकांत उर्फ भाई सावंत व अन्य दोघांनी मिऱ्या येथील घरामध्ये गळा आवळून खून केला तसेच त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला तसेच त्याची राख व हाडे समुद्रात फेकून दिल्याचे पुढे आले होते. या प्रकरणी सुकांत उर्फ भाई गजानन सावंत (वय ४७), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (वय ४३) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (सर्व रा. सडामिऱ्या-रत्नागिरी) या संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणी छोटा भाई उर्फ रूपेश सावंत यांनी न्यायालयात जामीन मिळावा, अशी मागणी अर्ज केला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. सरकार पक्षाकडून अॅड. अनिरूद्ध फणसेकर यांनी न्यायालयापुढे युक्तीवाद केला.
--------

मोटारीच्या धडकेत एक जखमी

रत्नागिरी ः रत्नागिरी-हातखंबा रस्त्यावर महालक्ष्मी मंदिर येथे मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात मोटार पिकअप् चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय लक्ष्मण धनावडे (वय ३०, रा. करबुडे धनावडेवाडी) असे अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) रात्री अकराच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय धनावडे हे दुचाकी घेऊन रत्नागिरी ते हातखंबा असे जात असताना समोरून येणाऱ्या मोटार पिकअपने धनावडे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
---------
मिरजोळे येथे तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी ः शहरालगतच्या मिरजोळे येथे जयगड बंदरातील कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नईम मेहबूब खान (वय २३, रा. शिवाजीनगर रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी (ता. १) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नईम खान हा जयगड येथील आंग्रे पोर्टचा कर्मचारी होता. नईम याची दुचाकी ही रस्त्यावर उभी होती तर नईम याचा मृतदेह रस्त्याकडील असलेल्या बागेतील आंब्याच्या फांदीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्याच ठिकाणी नईमची बॅग पडलेली होती. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात केला होता. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
--

मृत्यूस कारणीभूत स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः निष्काळजीपणे दुचाकी चालवून ट्रकला बाजू देऊन जाण्याच्या नादात झालेल्या अपघातप्रकरणी मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत कृष्णा पाटील (वय ३२, रा. मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) एप्रिलला रात्री आठच्या सुमारास शहरातील क्रांतीनगर बसस्टॉपजवळ घडली होती. शनिवारी ईश्वर वाघमारे (वय ३१, रा. वठार हातकणंगले, कोल्हापूर) हे ट्रक घेऊन एमआयडीसी-मिरजोळे, कोकणनगरमार्गे चिपळूणला जात होते. ते क्रांतीनगर बसस्टॉपजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून येणारे संकेत पाटील याने दुचाकी भरधाव वेगाने त्यांना बाजू देण्याचा प्रयत्न करत होता; परंतु त्याचवेळी समोरून रिक्षा व इतर वाहने आल्याने संकेतने दुचाकी डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुचाकीवरील नियंत्रण सुटून ट्रकच्या उजव्या बाजूच्या मागील टायरजवळ आदळली. यात संकेतच्या डोक्याला व इतर शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
---

करजुवे खाडीत वृद्धाचा बुडून मृत्यू

साडवली ः करजुवे खाडीत वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करजुवे भोईवाडी येथील तुकाराम बाळू पारधी असे बुडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तुकाराम बाळू पारधी हे ३० एप्रिलला संध्याकाळी करजुवे खाडीत गेले होते. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले होते. त्यांचा १ मे रोजी शोध घेतला असता सकाळी ११ वा. खाडीच्या पाण्याच्या पात्रात मृतदेह सापडला. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस शिंदे करत आहेत.

-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com