‘नाबर इंग्लिश मीडियमच्या 
स्कूल बसचे बांद्यात लोकार्पण

‘नाबर इंग्लिश मीडियमच्या स्कूल बसचे बांद्यात लोकार्पण

00114
बांदा ः नाबर प्रशालेत बसच्या उदघाट्न प्रसंगी उपस्थित संस्थाध्यक्ष मंगेश कामत आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

‘नाबर इंग्लिश मीडियमच्या
स्कूल बसचे बांद्यात लोकार्पण

कामत चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार

बांदा, ता. २ ः श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेने विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रशाळेच्या नूतन स्कूल बसचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत म्हणाले, "प्रशाला गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. केवळ शिक्षण देणे हेच प्रशालेचे काम नव्हे तर त्यासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठीही शाळा सतत प्रयत्नशील असते. गेल्या वर्षीपासून आयसीएससी, सीबीएससी आणि महाराष्ट्र शासन यांचा एकत्रित अभ्यासक्रम डिजिटल अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये सुरू करण्यात आला. डिजिटल क्लासरूम, अत्याधुनिक सुविधायुक्त संगणक कक्ष, कलादालन यांनी सुसज्ज अशी ही प्रशाला आहे. अगदी माफक दरात विद्यार्थ्यांना उच्च आणि उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी ही शाळा नेहमीच प्रयत्नशील आहे. उच्च दर्जाचे शिक्षण खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी शाळेचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि म्हणूनच आणखी एक पाऊल पुढे टाकून या शाळेने विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. दरम्यान, शाळेने खास प्रशालेची स्कूल बस विकत घेतली आहे. जेणेकरून लांबच्या विद्यार्थ्यांना प्रवास करणे सुखकर होईल आणि या प्रशालेमध्ये प्रवेश घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल करतील, यासाठी हा प्रशालेचा व संस्थाचालकांचा प्रयत्न आहे." संस्थाध्यक्ष कामत यांच्या हस्ते स्कूल बसचे उद्घाटन करण्यात आले. बांदा गावातील अनेक लोकांचा यासाठी आर्थिक हातभार लागला. लवकरच जूनपूर्वी प्रशालेचे दुसरी बस देखील उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com