वैभववाडीला ‘अवकाळी’ने झोडपले

वैभववाडीला ‘अवकाळी’ने झोडपले

00126
वैभववाडी ः तालुक्यातील अरूळे परिसराला मंगळवारी पावसाने झोडपुन काढले.

वैभववाडीला ‘अवकाळी’ने झोडपले

लग्न सभारंभात व्यत्यय; जिल्ह्यातील काही भागांतही पावसाच्या सरी

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ ः जिल्ह्यातील काही गावांना जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. घाट परिसरातील गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वाची चांगलीच तारांबळ उडाली. लग्न आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांची या पावसाने डोकेदुखी वाढविली आहे. जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणात प्रचंड उष्मा तयार झाला होता. दुपारी बाराच्या सुमारास वैभववाडी तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास घाट परिसरातील गावांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले. जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर काही क्षणातच करूळ, भुईबावडा घाट, करूळ, नावळे, अरूळे, सडुरे, शिराळे, कुर्ली, घोणसरी, खांबाळे, आर्चिणे, ऐनारी, भुईबावडा या परिसरातील गावांमध्ये पावसाला सुरूवात झाली. घाट क्षेत्रानजीकच्या गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. या भागाला अर्धा तास पावसाने झोडपुन काढले. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. आज मोठ्या प्रमाणात लग्न सभारंभ होते. याशिवाय अनेक ठिकाणी सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली.
---------
चौकट
पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा पाऊस अधिकत्तर घाटक्षेत्रानजीकच्या गावात पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाच्या शक्यतेमुळे लग्नासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेल्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com