तेजस कांबळेचे ‘नीट’मध्ये यश

तेजस कांबळेचे ‘नीट’मध्ये यश

तेजस कांबळेचे ‘नीट’मध्ये यश
वैभववाडी ः विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली यांच्यावतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत पर्यावरणशास्त्र विषयात खांबाळे-बौद्धवाडी येथील तेजस कांबळे याने यश मिळविले. तेजसची आर्थिक परिस्थिती बेताची असून वडील दयानंद हे खासगी कंपनीत नोकरीला, आई प्रज्ञा कांबळे या गृहिणी आहेत. घरामध्ये कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना तेजसने मेहनत घेत नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवून सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने दुसऱ्या‍च प्रयत्नात हे यश मिळविले. प्रा. डॉ. दीपा वर्मा, प्रा. रोहन डिसोजा, प्रा. डॉ. निखिल तेली यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----------------
‘एनएमएमएस’मध्ये तन्वी हर्णेचे यश
कणकवली ः माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी प्रशालेची आठवीतील विद्यार्थिनी तन्वी हर्णे हिने एनएमएमएस परीक्षेत सुयश मिळविले. तन्वीची एनएमएमएस परीक्षेमध्ये विशेष मागास प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. तिला शिक्षक कसालकर, भानुसे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कनेडी गट शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर. एच. सावंत आदींनी अभिनंदन केले.
--------------------
सोहम केसरकरचे ‘टॅलेंट सर्च’मध्ये यश
कुडाळ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगुळी-धुरीटेंबनगरच्या चौथीतील सोहम केसरकर या विद्यार्थ्याने सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत २०० पैकी १२६ गुण मिळवून कांस्यपदक मिळविले. प्राथमिक शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या भारत्नरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत त्याने ३०० पैकी २१८ गुण मिळवून यश प्राप्त केले. या आधीही त्याने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत कांस्यपदक मिळविले आहे.
---------------------
कणकवलीत शुक्रवारी ‘वेडी विजया’
कणकवली ः शहरातील श्री देव स्वयंभू मंदिराच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (ता.५) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी दहाला लघुरुद्र, बाराला आरती व तीर्थप्रसाद, नऊला महाप्रसाद, सायंकाळी चारपासून सुस्वर भजने, सायंकाळी सातला केळुसकर महाराजांचे कीर्तन, रात्री साडेनऊला श्री सावरीश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरे-वेंगुर्ले यांचा ‘वेडी विजया’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com