पान तीन मेन-वऱ्हाडाचा टेम्पो उलटून 45 जखमी

पान तीन मेन-वऱ्हाडाचा टेम्पो उलटून 45 जखमी

00142
वागदे : येथील महामार्गावर टेम्‍पो पलटी होऊन अपघात झाला.

00143
कणकवली : अपघातातील जखमींवर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत.


वऱ्हाडाचा टेम्पो उलटून ४५ जखमी

वागदेतील घटना; लग्न आटोपून पाटगावकडे जाताना अपघात

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ ः चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वागदे (गावठणवाडी) बस थांबा येथे टेम्पो उलटून ४५ जण जखमी झाले. आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. यात टेम्‍पोच्या हौद्यात बसलेले ४५ पैकी १२ जण गंभीर जखमी आहेत. कुडाळ येथे आलेली ही मंडळी लग्नसोहळा आटोपून पाडगाव येथे जात होती. दोघांवर गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ), १० जणांवर जिल्‍हा रूग्‍णालय ओरोस आणि उर्वरीतांवर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत.
कुडाळ येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात आज दुपारी विवाह सोहळा झाला. या सोहळ्यासाठी पाडगाव (ता.देवगड) येथून ४५ मंडळी आली होती. जेवण आटोपून दुपारी दीडला ही मंडळी कुडाळ येथून पाडगावच्या दिशेने निघाली होती. दुपारी २.१५ च्या सुमारास वागदे गावठणवाडी येथे चालक गुरूनाथ काशिराम गुरवचे (वय २७, रा. पाटगाव) टेम्‍पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्‍पो महामार्गावर आडवा झाला. यात हौद्यात बसलेले सर्व ४५ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने जखमींना कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले. वागदे सरपंच संदीप सावंत, सामाजिक कार्यकर्ते राजा पाटकर यांनीही यावेळी मदतकार्य केले. जखमींमधील बहुतांश जणाच्या हाताला, पायाला आणि डोक्‍याला तसेच चेहऱ्याला जखमा झाल्‍या होत्या. यात अनेक वृद्धांना चालणेही कठीण झाले होते. पाटगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये कुडाळमधील एका शिक्षिकेने बरीच वर्षे सेवा केली होती. त्‍या शिक्षिकेच्या मुलाचे आज कुडाळ येथे लग्न होते. तर या लग्न सोहळ्यासाठी पाटगाव येथील ४५ ग्रामस्थ कुडाळ येथे टेम्‍पोतून सकाळी आले होते. अपघातावेळी टेम्‍पो चालकाने मद्यप्राशन केल्‍याची माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्‍हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत आदींनी उपजिल्‍हा रूग्‍णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. खासदार राऊत यांनी सर्व जखमींवर शासकीय रूग्‍णालयात चांगले उपचार व्हावेत असे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
--
इतर जखमी कणकवली रूग्‍णालयात
तेजा सुहास गुरव (वय १२), सुचिता रामा गुरव (वय ५५), सानिका संतोष गुरव (वय ३०), विजय शांताराम गुरव (वय ४५), दक्ष दिनेश गुरव (वय १६), संजीवनी संदीप गुरव, अनिता लक्ष्मण गुरव, जयश्री नारायण गुरव (वय ६०), सुषमा दीपक गुरव (वय ५५), अस्मी शिवाजी गुरव (वय १२), विजय वसंत गुरव (वय ४०), संस्कार तुकाराम गुरव (वय १८), आरोही रवींद्र गुरव (वय १०), शिवानी शिवाजी गुरव (वय ४०), रूपाली रामचंद्र गुरव (वय ४०), बाबला सखाराम गुरव (वय ६५), सुविधा बाबला गुरव (वय ६०), अस्मिता अजय गुरव (वय ४०), मानसी सुहास गुरव (वय १९), सचिन वसंत गुरव (वय ४३), महेश गुरव (वय ४०), पार्थ जितेंद्र गुरव (वय ९),कलावती काशिराम गुरव (वय ५१), प्रियांका रामचंद्र गुरव (वय २२),सविता बाबुराव गुरव (वय ६०), स्मिता गुरव, सिद्धेश गुरव (वय २५), अनिता विजय गुरव (वय ५५), तेजस्वी गुरव (वय १३), चालक गुरूनाथ काशिराम गुरव (वय २७) यांच्यावर कणकवली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
--
अपघातातील गंभीर जखमी
अनंत धोंडू गुरव (वय ५५), मनीषा महेश गुरव (वय ३०), मनीषा रवींद्र गुरव (वय४६), सुनीता शिवाजी गुरव (वय १७), सचिन सदाशिव गुरव (वय ३०), प्रणिता विष्‍णु गुरव (वय ५०), रोशनी रमेश राघव (वय २३), संजना संदीप गुरव (वय २०), विजया विजय गुरव (वय ५०), अनिता सुरेश गुरव (वय ५०), चिराग विनोद गुरव (वय १२), विष्णू वामन गुरव (वय ५२) यांचा समावेश आहे. या सर्वांवर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार करून नंतर ओरोस येथील जिल्‍हा रूग्‍णालयात हलविले. तर यातील दोघांची प्रकृती आणखी खालावल्‍याने त्‍यांना सायंकाळी उशिरा (गोमेकॉत) हलविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com