बाबाजी गावकर यांचा
पेडणे-गोवा येथे सत्कार

बाबाजी गावकर यांचा पेडणे-गोवा येथे सत्कार

03923
गोवा ः बाबाजी गावकर यांचा सत्कार करताना आमदार जीत आरोलकर. सोबत इतर.

बाबाजी गावकर यांचा
पेडणे-गोवा येथे सत्कार
ओटवणे, ता. २० ः येथील बांधकाम व्यावसायिक तथा ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर यांचा श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला. गोवा हाऊसिंग बोर्ड कार्पोरेशनचे चेअरमन तथा मांद्रे मतदार संघाचे आमदार जित आरोलकर यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पेडणे (गोवा) नजीक तुये-मुरमुसे येथील श्री सटीदेवी महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कामात गावकर यांनी विशेष सहकार्य केले. ओटवणे गावचे मानकरी असलेले गावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन सुद्धा या जीर्णोद्धारासाठी लाभले. त्यांच्या या सहकार्याबद्दल श्री सटीदेवी महालक्ष्मी पुन:प्रतिष्ठापना सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पै काणे कंपनीचे संचालक सुनील पै काणे, उत्सव समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ कलशावकर, तुये ग्रामपंचायत सदस्या अनिता साळगावकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष सचिन कोचरेकर, सचिव सुदेश नाईक, बांधकाम समिती अध्यक्ष सुभाष साळगावकर, सचिव कृष्णा तळवणेकर, मार्गदर्शक लक्ष्मण खरवत, गौरेश नाईक, रावजी जाधव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com