‘जलजीवन मिशन’ कामांचा देवगडमध्ये बुधवारी आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जलजीवन मिशन’ कामांचा
देवगडमध्ये बुधवारी आढावा
‘जलजीवन मिशन’ कामांचा देवगडमध्ये बुधवारी आढावा

‘जलजीवन मिशन’ कामांचा देवगडमध्ये बुधवारी आढावा

sakal_logo
By

‘जलजीवन मिशन’ कामांचा
देवगडमध्ये बुधवारी आढावा
देवगड ः जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असणाऱ्या तालुक्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता.३१) रोजी सकाळी अकराला देवगड येथील इंद्रप्रस्थ सभागृहात बैठकीचे आयोजन केले आहे. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरामध्ये नळाने पुरवठा करण्यासाठी राज्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून महाराष्ट्र सरकारने ‘जलजीवन मिशन’ कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नळपाणी पुरवठा योजनांच्या कामांना सुरुवात केली आहे; मात्र या कामांमध्ये त्रुटी आढळून येत आहेत. गावागावांतून अनेक तक्रारी येऊ लागल्याने आमदार राणे यांनी मतदारसंघातील कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यांत जनजीवन मिशन योजनेच्या कामांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी त्या तक्रारी बैठकीत मांडून निवारण करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
कास येथे विविध कार्यक्रम
बांदा ः कास येथील श्री देवी माऊली आणि रवळनाथ मंदिराचा वर्धापन दिन सोहळा २७ ते २९ मे दरम्यान साजरा केला जाणार आहे. यानिमित्त गोवा फ्रेंडस् सर्कल व कास ग्रामस्थांतर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत. उद्या रविवारी (ता. २८) सकाळी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, सायंकाळी निमंत्रितांसाठी भजन स्पर्धा होणार आहे. सोमवारी (ता. २९) सकाळी रांगोळी स्पर्धा, दुपारी श्रींची महापूजा, महाप्रसाद, सायंकाळी भजन, रात्री बक्षीस वितरण व ‘ब्रह्मपातकी काळभैरव’ या दशावतारी नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
--------------
कणकवलीत आज ‘पेन्शनर्स’ सभा
कणकवली ः कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. २८) सकाळी साडेदहाला कलमठ येथील पोलिस ठाणे नजीकच्या पेन्शनर भवन येथे आयोजित केली आहे. सभेत पेन्शनरांना मार्गदर्शन करण्यात येणार असून असोसिएशनतर्फे काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात येणार आहेत. पेन्शनर सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी केले आहे.
----------------
सावंतवाडी निबंधक कार्यालयाचे स्थलांतर
सावंतवाडी ः येथील तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. हे कार्यालय तारा हॉटेलजवळील इमारतीत गेली कित्येक वर्षे होते. आता ते सालईवाडा येथील दूरसंचार कार्यालयानजीकच्या जागेत हलविले आहे, अशी माहिती सहाय्यक निबंधक क्षीरसागर यांनी दिली.