खेळाडू प्रशिक्षण, सहाय्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळाडू प्रशिक्षण, सहाय्यासाठी 
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
खेळाडू प्रशिक्षण, सहाय्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

खेळाडू प्रशिक्षण, सहाय्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

sakal_logo
By

खेळाडू प्रशिक्षण, सहाय्यासाठी
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व सहभागी झालेल्या होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबींसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबत शासन निर्णयामध्ये नमूद १४ अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन, स्पर्धापूर्व प्रशिक्षणे, उपकरणे, मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात व खरेदी, गणवेश आदींचा यात समावेश आहे. या योजनेसाठी ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियपशिप, युथ ऑलिम्पिक, ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई-जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप या स्पर्धा आहेत. खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, संचलनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुगे बालेवाडी, पुणे यांचेकडे सादर करण्याचे आवाहन ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.