कालुस्ते बनणार पर्यटन क्षेत्रः आमदार निकम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालुस्ते बनणार पर्यटन क्षेत्रः आमदार निकम
कालुस्ते बनणार पर्यटन क्षेत्रः आमदार निकम

कालुस्ते बनणार पर्यटन क्षेत्रः आमदार निकम

sakal_logo
By

ratchl२७५.jpg
०५३५४
चिपळूणः कालुस्ते येथील विविध कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित आमदार शेखर निकम सोबत रामकृष्ण कदम, आदिती गुढेकर आदी.

कालुस्ते बनणार पर्यटन
क्षेत्रः आमदार निकम
चिपळूण, ता. २८ः तालुक्यातील कालुस्ते बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री बाजीबुवा कालेश्‍वरी मंदिर येथील विविध कामांचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. या कामांमुळे येणाऱ्या काळात कालुस्ते गाव पर्यटन क्षेत्र होईल, असे प्रतिपादन आमदार निकम यांनी केले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्री बाजीबुवा कालेश्‍वरी मंदिराच्या पर्यटनस्थळासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत आमदार शेखर निकम व कालुस्ते गावातील स्थानिक ग्रामस्थ, मुंबई, पुणे ग्रामस्थ यांनी मागणी केली होती. त्यासाठी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने ते काम मार्गी लागले. या कामासाठी मुंबई येथे वास्तव्यास असणारे रमेश कदम यांचेही मोठे योगदान लाभले. या कामामध्ये सभामंडप, कंपाऊंड वॉल, पेवरब्लॉक, मोरीचे बांधकाम, शौचालय ही कामे मार्गी लागणार आहेत. या कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांनी केले. या वेळी माजी जि. प. सदस्या मीनल काणेकर, पांडुरंग माळी, सुनील तटकरे, कालुस्ते सरपंच रामकृष्ण कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

------------
ratchl२७६.jpg
०५३५५
चिपळूणः कब्रस्तानमधील सरंक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार शेखर निकम.

चिपळुणात अल्पसंख्याक
निधीतून कब्रस्तानची कामे
चिपळूण, ता. २८ः शहरातील चार कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचा प्रश्‍न आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागला आहे. अल्पसंख्यांक निधीतून मंजूर झालेल्या शहरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी आमदार शेखर निकम व मान्यवरांच्या हस्ते झाला. आपल्या मागणीची दखल घेत ती कामे तातडीने मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार निकम यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. शहरातील उक्ताड मापारी मोहल्ला कब्रस्तानला कंपाऊंड भिंत बांधणे, पेठमाप येथील कब्रस्तानला कंपाऊड वॉल बांधकाम, मुरादपूर मिठागरी मोहल्ला कब्रस्तानात वॉल बांधकाम, मुरादपूर मदिना मशिद कब्रस्तानास काँक्रिट संरक्षक भिंतीचे बांधकाम आदी कामांचे भूमिपूजन पार पडले. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही या वेळी आमदार निकम यांनी दिली.
या वेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सिद्धेश लाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, नाझिमभाई अफवारे, डॉ. मुश्‍ताक मुकादम, मनोज जाधव, खालिद दाभोलकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

---------------------
पावस एज्युकेशन सोसायटीचा
बारावीचा निकाल १०० टक्के
पावस, ता. २८ः पावस एज्युकेशन सोसायटी संचालित मुराद उमर मुकादम आणि राबिया शेख अहमद नाखवा ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, पावस रत्नागिरीचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये कला शाखा - मुकादम उमेरा उमर (८०.१७ टक्के), वस्ता अमाना इम्तियाज़ (७१.१७), खान अबरार अब्दुल गफ्फार (६७.१७) तर वाणिज्य शाखा ः दरवेश अल्फिया नवाज (७४.१७), नाईक नदीम शमसुद्दीन (७४), नाखवा सिद्रा समद (६७.१७) तसेच विज्ञान शाखा हरचिरकर रिज़ा लाईक (७६), मस्तान तुबा नदीम (६९.८३), सावकार आइशा परवेज (६६.८३) असे पहिल्या तीन क्रमांकाने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या कॉलेजतर्फे ११वी आणि १२वीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

--------------