‘सावंतवाडी टर्मिनस’ मार्गी लावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सावंतवाडी टर्मिनस’ मार्गी लावा
‘सावंतवाडी टर्मिनस’ मार्गी लावा

‘सावंतवाडी टर्मिनस’ मार्गी लावा

sakal_logo
By

05406
मुंबई ः खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देताना अर्चना घारे.


‘सावंतवाडी टर्मिनस’ मार्गी लावा

‘राष्ट्रवादी’ची मागणी; अर्चना घारेंचे खासदार सुळेंना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः येथील रेल्वे स्थानकावर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला थांबा मिळावा. सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामात लक्ष घालावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात घारे यांनी म्हटले आहे की, सीएसएमटी ते मडगाव या मार्गावर नव्याने ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू होत आहे. कोकण रेल्वेच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या या एक्स्प्रेसमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सात तासांत पूर्ण करता येणार आहे. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला ठाणे, चिपळूण, रत्नागिरी व कुडाळ येथे थांबे दिले आहेत; मात्र सावंतवाडीसारख्या तळकोकणातील महत्त्वाच्या स्थानकावर मात्र या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही. आपण ही बाब रेल्वेमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यास सावंतवाडी परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे. सावंतवाडी हे या रेल्वे मार्गातील प्रमुख स्थानक असून परिसरातील पर्यटन स्थळांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील रेल्वे टर्मिनसचे काम पाच-सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. टर्मिनस २ चे विस्तारीकरणाचे कामही प्रलंबित आहे. परिणामी या मार्गावर धावणाऱ्या २५-३० रेल्वे गाड्यांपैकी अवघ्या ९ ते १० गाड्या सध्या येथे थांबत आहेत. यामुळे लांबच्या प्रवाशांची संख्या कमी होत असून स्थानकाचा दर्जा देखील कमी होण्याची भीती आहे. संबंधित प्रश्नाबाबत रेल्वेमंत्र्यांसोबत समवेत चर्चा केल्यास सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ववत सुरू होऊन परिसरातील नागरिकांची व पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होईल, अशी मागणीही केली आहे. यावेळी खासदार सुळे यांनी, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस दुरुस्ती आणि ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला थांबा ही दोन्ही आवश्यक व तातडीचे कामे आहेत. याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करून लवकरच सावंतवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.