माणगावात पाच हजाराचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगावात पाच हजाराचा 
गुटखा जप्त; एकावर गुन्हा
माणगावात पाच हजाराचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा

माणगावात पाच हजाराचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा

sakal_logo
By

माणगावात पाच हजाराचा
गुटखा जप्त; एकावर गुन्हा

कुडाळ पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः बेकायदा गुटखा बाळगल्याप्रकरणी माणगावातील एकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मजित इब्राहिम शेख (वय ४४, रा. माणगाव मुस्लिमवाडी), असे त्याचे नाव आहे. या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ५ हजार ७५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. माणगाव बाजार येथे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कुडाळ पोलिसांनी ही कारवाई केली.
माणगाव बाजार येथील युसुफ पान येथे गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक दुपारी साडेबाराला माणगाव बाजार येथे गेले. यावेळी पोलिसांनी या पान स्टॉलची झडती घेतली असता समोरील बाकाखाली संशयास्पद पिशवी आढळली. या पिशवीमध्ये बेकायदेशीर गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ दिसून आले. यामध्ये केशरयुक्त विमल पान मसालाची ८७ पाकिटे, नजर ९००० ची २९० पाकिटे, व्हीआय तंबाखूची ८७ पाकिटे असा ५ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत पोलिस निरीक्षक शंकर चिंदरकर, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, हेडकॉन्स्टेबल हिप्परकर, कॉन्स्टेबल पाटील, आनंद पालव, भोई आदींचा सहभाग होता. याप्रकरणी शेख याच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आनंद पालव यांनी या घटनेची फिर्याद दिली.