धामापूर तर्फे संगमेश्वरच्या विकासासाठी कटीबध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामापूर तर्फे संगमेश्वरच्या विकासासाठी कटीबध्द
धामापूर तर्फे संगमेश्वरच्या विकासासाठी कटीबध्द

धामापूर तर्फे संगमेश्वरच्या विकासासाठी कटीबध्द

sakal_logo
By

rat२८p१.jpg
०५४८४
धामापूरः धामापूर तर्फे संगमेश्वर गावाच्या विकासासाठी झालेल्या बैठकीत गावकऱ्यांशी संवाद साधताना शेखर निकम.

धामापूर तर्फे संगमेश्वरच्या विकासासाठी कटीबध्द
आमदार शेखर निकम; बामणकडा धबधब्याचा विकसित
संगमेश्वर, ता. २८ः धामापूर तर्फे संगमेश्वर गावाच्या विकासासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही आमदार शेखर निकम यांनी दिली. त्यासह धामापूर तर्फे संगमेश्वर पाझर तलाव मंजूरीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यानी सांगितले. धामापूर तर्फे संगमेश्वर गाव भेट दौऱ्यामध्ये विविध विकास कामांचा आढावा व पाझर तलाव बाबत असणाऱ्या अडीअडचणीसंबंधी चर्चा केली.
या पाझर तलावाची उंची जास्त असल्यामुळे गावातील काही वाडयाचे पुनर्वसन प्रश्नी लोकांशी संवाद साधून उंची कमी प्रस्ताव,दळणवळण करिता रस्ते,साकव,जमीन मालकाच्या अडचणी याबाबत तेथील जनतेच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी जलसंपदा विभागाचे उपस्थित अधिकारी यांना जनतेच्या सर्व समस्या विचारात घेऊन तशा पध्दतीचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित करण्याची सूचना केली. सदर योजनेचे पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळणेबाबत शासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी आमदार शेखर निकम यांनी गावातील विविध विकास कामे, अडीअडचणी, मार्गी लागण्याचा शब्द दिला आणि धामापूर गावातील बामणकडा धबधबा पर्यटन वाढीच्यादृष्टीने विकसित करण्याबाबत विशेष प्रयत्न करणार असे सांगितले गेल्या तीन-चार वर्षामध्ये १ कोटी ४० लाखाचा निधी धामापूर तर्फे संगमेश्वर गावाच्या विकासाठी दिला व पुढील विकासकामांकरीता देखील शासनस्तरावरुन निधी उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न राहतील असे सांगितले.
यावेळी माजी पंचायती समिती संगमेश्वरचे सभापती दिलीप सावंत, माजी पंचायती समिती सदस्य नाना कांगणे, धामापूर गावचे सरपंच शांताराम भायजे, माखजन गावचे सरपंच मयुर बाष्टे, सागर भराडे, गावकर सोनू भायजे, दत्ताराम भायजे, सुशिल भायजे, अनंत गुरव, आदी उपस्थित होते.