Fri, Sept 22, 2023

अंमली पदार्थप्रकरणी
दोघे निर्दोष मुक्त
अंमली पदार्थप्रकरणी दोघे निर्दोष मुक्त
Published on : 28 May 2023, 11:23 am
अंमली पदार्थप्रकरणी
दोघे निर्दोष मुक्त
सावंतवाडी, ता. २८ ः अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुबारक इस्माईल खतीब (रा. कोल्हापूर) व सलीम शरफुद्दीन कापडी (रा. मलकापुर) या दोघांची निर्दोष मुक्तता केली. याकामी अॅड. परिमल नाईक, संदीप निंबाळकर, रवींद्र कंग्राळकर, सर्वेश कोठावळे यांनी काम पाहिले. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांकडून आरोंदा तपासणी नाक्यावर करण्यात आली होती. त्याप्रकरणी दोघांना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हा प्रकार मार्च २०२१ मध्ये घडला होता. याप्रकरणी येथील न्यायालयात खटला सुरू होता. सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले; परंतु त्यांच्या जबाबात विसंगती आढळून आल्यामुळे संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.