अंगणवाड्या दत्तक घेण्याबाबत प्रोत्साहन द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाड्या दत्तक घेण्याबाबत प्रोत्साहन द्या
अंगणवाड्या दत्तक घेण्याबाबत प्रोत्साहन द्या

अंगणवाड्या दत्तक घेण्याबाबत प्रोत्साहन द्या

sakal_logo
By

rat२८p३३.jpg-
M०५६०१
रत्नागिरीः महिला बचत गटांना कर्ज वाटपाचा धनादेश प्रदान करताना मंत्री मंगलप्रभात लोढा.
--------
आयटीआयच्या नुतनीकरणासाठी
निधी देणारः मंगलप्रभात लोढा
रत्नागिरी, ता. २८ः महिला बचतगटांचे बळकटीकरण करण्यासाठी ब्रँडिंग व मार्केटिंग करा. सामाजिक संस्था, कंपन्या आदींचे सहकार्य घेऊन अंगणवाडी दत्तक घेण्याबाबत प्रोत्साहन द्या. आयटीआयच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित विभागांना दिल्या.
राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी (ता. २८) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महिला व बालविकास विभाग, पर्यटन विभाग आदी विभागांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत स्तरावर उद्योजकता कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्याबाबतचा आढावा लोढा यांनी घेतला. जिल्ह्यात ११ ठिकाणी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी दिली.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, प्रसिद्ध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक व पुरातन स्थळे, नव्याने शोध लागलेला कातळशिल्प यांचा आढावा घेताना लोढा यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत मंजूर कामे, सुरू असलेली कामे आणि प्रस्तावित कामांचाही आढावा घेतला.

चौकट
लाभार्थ्यांना गुंतवणूक प्रमाणपत्र
महिला अर्थिक विकास महामंडळातर्फे दोन महिला बचतगटांना प्रत्येकी १० लाख व ६ लाख रुपयाचे कर्ज वाटप वितरण करण्यात आले. तसेच महिला व बालविकास विभागाकडून कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या अनाथ बालकांना प्रत्येकी ५ लाख रुपये गुंतवणूक प्रमाणपत्र चार लाभार्थ्यांना देण्यात आले. महिला व बाल विकास विभाग विभागांतर्गत माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत एकूण ५ लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्र मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते देण्यात आले.