जैतिर उत्सवाची कवळासाने सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैतिर उत्सवाची कवळासाने सांगता
जैतिर उत्सवाची कवळासाने सांगता

जैतिर उत्सवाची कवळासाने सांगता

sakal_logo
By

05623
तुळस ः येथील श्री देव जैतीर उत्सवाची रविवारी कवळासाने सांगता झाली. यावेळी देवघरी परतत असताना भाविकांना दर्शन देताना श्री देव जैतीर व तरंग देवता.

जैतिर उत्सवाची कवळासाने सांगता

भाविकांची अलोट गर्दी; शंका, समस्यांचे निराकरण

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३० ः दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान तुळस (ता.वेंगुर्ले) येथील नराचा-नारायण म्हणून ख्याती असलेल्या श्री देव जैतिर उत्सवाची सांगता आज ‘कवळास’ या कार्यक्रमाने झाली. यावेळी देवाचा कौल घेण्यासाठी व श्री देव जैतीर आणि तरंग देवतांचे खेळ पाहण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.
तुळस येथील प्रसिद्ध जैतिर उत्सवाला १९ मेपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली होती. ११ दिवस चाललेल्या या उत्सवाची सांगता आज ‘कवळासा’ने झाली. या ११ दिवसांत गावातील प्रत्येक घरी जैतीराने भेटी देत आशीर्वाद दिला. भाविकांच्या विविध शंका, समस्यांचे निराकरणही जैतीर व तरंग देवतांमार्फत मांडावर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी राज्यातील असंख्य भाविकांनी श्री जैतीराचे दर्शन घेतले. कवळासा दिवशी प्रथेप्रमाणे सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले. अवसारी श्री देव जैतीर ने मांडावर खेळ केले. दुपारनंतर कवळासाच्या मुख्य उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी अवसरी श्री देव जैतीर व तरंग देवतांनी मांडावर खेळ करत शेवटी गावकऱ्यांना कौल दिला. यानंतर सायंकाळी देव देवघरी विसावले. या देवाचा संचार फक्त महोत्सवी दिवसांतच होत असतो. बाकी कालावधीत जैतोबांच्या मूर्तीस तांदळाचा प्रसाद लावून कौल घेतले जातात. वर्षभरातील इतर धार्मिक कार्य तरंगामार्फत पूर्ण केली जातात. आज कवळास कार्यक्रमानिमित्त जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी श्री जैतीराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.