अभिनेत्री सुप्रिया पाठारेंच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री सुप्रिया पाठारेंच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन
अभिनेत्री सुप्रिया पाठारेंच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन

अभिनेत्री सुप्रिया पाठारेंच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन

sakal_logo
By

rat29p4.jpg
05673
रत्नागिरीः येथील मंथन दी स्कूल ऑफ क्रीएटिव्हच्या कलाप्रदर्शनात मराठी सिने अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचे स्वागत करताना मान्यवर.
--------
अभिनेत्री सुप्रिया पाठारेंच्या हस्ते
वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ः मंथन दी स्कूल ऑफ क्रीएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँन्ड आर्टमधील विद्यार्थ्यांचा वार्षिक कलाप्रदर्शन व अॅडव्हर्टायझिंग क्षेत्रातील विविध करिअर संधी या विषयावरील मार्गदर्शन व चर्चा कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम पटवर्धन हायस्कूलच्या कॅप्टन सुभाषचंद्र ठाकूर सभागृहात झाला.
पहिल्या दिवशी झालेल्या कार्यशाळेमध्ये चित्रकार दिगंबर मांडवकर यांचे जलरंगात प्रात्यक्षिक झाले. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ कलाशिक्षण तज्ञ संजय साळुंखे यांचे ग्राफिक डिझाईन आणि व्यावसायिक कला या विषयावर मार्गदर्शन झाले. शेवटच्या दिवशी सीनिअर क्रीएटिव्ह डायरेक्टर विक्रम ढेंबरे यांचे जाहिरात कलेतील व्यावसायिक संधी या विषयावर मार्गदर्शन झाले.
या तीन दिवसीय कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील ४० विद्यार्थी उपस्थित होते. तसेच मंथन आर्ट स्कूलचे डायरेक्टर शशिकांत गवळी, रत्नागिरी शाखाप्रमुख संदेश पालये, सल्लागार समितीचे सदस्य विनायक हातखंबकर, अॅड. महेंद्र मांडवकर, उदय शिंदे, संजय बैकर, निलिमा शिंदे, रोहित मयेकर, रूपेश पंगेरकर, संतोष कोलते, दरवजकर आदी उपस्थित होते.