
रत्नागिरी- विनायका रे संगीत कार्यक्रमाने सावरकरांना अभिवादन
फोटो ओळी
-rat२९p१५.jpg-KOP२३M०५७०७ रत्नागिरी ः सावरकर नाट्यगृहात विनायका रे कार्यक्रम सादर करताना गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात उभे राहून वीर सावरकरांना मानवंदना देताना रसिक प्रेक्षक.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
स्वातंत्रयवीरांना उभे राहून मानवंदना
विनायका रे ; गायक प्रथमेश लगाटे, मुग्धा वैशपायन यांचा सुरेल कार्यक्रम रंगला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ''ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला'' या अजरामर गीताच्या सादरीकरणावेळी प्रेक्षागृहातील सर्व प्रेक्षकांनी उभे राहून वीर सावरकरांना आगळी मानवंदना दिली. निमित्त होते आघाडीचा गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन यांच्या विनायका रे या कार्यक्रमाचे. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमाने सावरकर विचार जागरण सप्ताहावर कळस चढवला. ७५० ते ८०० प्रेक्षकांनी संगीत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री. भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आठवडाभर सावरकरांना विविध कार्यक्रमांतून अभिवादन केले. त्यात विनायका रे हा कार्यक्रम सुरेख झाला.
कार्यक्रमात सुरवातीला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते गायक प्रथमेश लघाटे आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्र साळवी यांच्या हस्ते गायिका मुग्धा वैशंपायन हिचा सन्मान करण्यात आला. मुग्धा वैशंपायन हिने ने मजसी ने, हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयदेव जयदेव जय जय शिवराया, अनादी मी अनंत मी, विनायका रे ही गीते सुरेल आवाजात म्हटली. याशिवाय बोलावा विठ्ठल, पद्मनाभा नारायणा या अभंगांनी रसिकांची मने जिंकली. प्रथमेश लघाटे याने शतजन्म शोधिताना, जय देव जय देव जय जय शिवराया, परवशता पाश दैवे ही गीते ताकदीने सादर केली. दोन्ही गायकांनी फर्माईश केलेली गीते सादर केली.
कार्यक्रमात निवेदन धनश्री मारोटकर, तबलासाथ रूपक वझे, पखवाज मिलिंद लिंगायत, संवादिनी हर्षल काटदरे, कीबोर्ड राजन किल्लेकर, साईड रिदम प्रसन्ना लघाटे, अथर्व चांदोरकर यांनी केले. ध्वनी व्यवस्थापन एस. कुमार्स साऊंड यांनी अतिशय उत्तम केले. सर्व कलाकारांचे स्वागत संयोजक रवींद्र भोवड, तनया शिवलकर, केशव भट, गौरांग आगाशे, मनोज पाटणकर, अॅड. विनय आंबुलकर, संजय जोशी, मंगेश मोभारकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीप्ती आगाशे यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले. नाट्यगृहाचे व्यवस्थापक मयेकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.