
‘सत्यप्रती’च्या समस्येवर तातडीने तोडगा काढा
05747
सुरेश भोगटे
‘सत्यप्रती’च्या समस्येवर
तातडीने तोडगा काढा
सुरेश भोगटे; प्रांताधिकाऱ्यांना भेटणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः बारावी निकालानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र जमा करताना सत्यप्रतीसाठी विद्यार्थ्यांना विशेष कार्यकारी सध्या शोधून सापडत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज असून याबाबत लवकरच प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची भेट घेणार असल्याचे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सांगितले.
बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी कागदपत्र जमवताना विविध प्रकारचे दाखले जोडावे लागतात. यामध्ये प्रामुख्याने जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, बोनाफाईड सर्टिफिकेटसह इतर कागदपत्रांचा समावेश असतो. या दाखल्यांच्या झेरॉक्स प्रतींवर आवश्यक असणारी सत्यप्रत ही विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत दिली जात होती; परंतु आता विशेष कार्यकारी अधिकारी नेमले नसल्याने सत्य प्रतीसाठी विद्यार्थी व पालकांची मोठी धावपळ होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.