मोती तलावाचे सौंदर्य जपा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोती तलावाचे सौंदर्य जपा
मोती तलावाचे सौंदर्य जपा

मोती तलावाचे सौंदर्य जपा

sakal_logo
By

05696
बबन साळगावकर


मोती तलावाचे सौंदर्य जपा

बबन साळगावकर; घिसाडघाईने मजबुतीकरण

सावंतवाडी, ता. २९ ः येथील मोती तलावाचे बांधकाम करत असताना त्याचे सौंदर्य जपा. तलावाचे डबके होऊ देऊ नका, अशी विनंती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून प्रशासनास केली आहे. त्या ठिकाणी बांधकाम खात्याचे अधिकारी केवळ मजबुती करण्याच्या नावाखाली भिंती घालण्याचे काम करत आहेत; मात्र, दर्जा जपण्यासाठी कोणीही लक्ष देत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त करीत मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःहून याकडे लक्ष घालावे, असे आवाहन केले.
प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘मोती तलाव मजबुतीकरणाचे काम घिसाडघाईने सुरू आहे. बांधकाम करत असताना तलावाचे सौंदर्य जपले जात नसून बांधकाम खात्याचे अधिकारी त्याचे डिझाईन न बनवता केवळ मजबुती करण्यासाठी भिंत घालत आहेत. दर्जाकडेही कुणाचेच लक्ष नाही. तलावाचे डबके बनवण्याचे काम सुरू आहे. तलाव सर्व बाजूंनी लहान लहान करत त्याच डबकं होत आहे. मोती तलाव हे शहराचे ‘हार्ट ऑफ द सिटी’ म्हणून मानले जाते. या तलावाचे बांधकाम करत असताना त्याचा गोलाकार आकार जपणे आवश्यक होते; परंतु, तसे न होता बांधायची म्हणून भिंत बांधून मजबुतीकरण सुरू आहे. मंत्री केसरकरांनी या कामाच्या दर्जा आणि तलावाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही तसेच तलावाची लांबी रुंदी आणि गोलाकार जपला जाईल, याकडे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लक्ष देऊन काम करण्याची विनंती साळगावकर यांनी केली आहे.