सिंधुदुर्गनगरी येथे ८ जूनला रोजगार मेळाव्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गनगरी येथे ८ जूनला 
रोजगार मेळाव्याचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी येथे ८ जूनला रोजगार मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी येथे ८ जूनला रोजगार मेळाव्याचे आयोजन

sakal_logo
By

सिंधुदुर्गनगरी येथे ८ जूनला
रोजगार मेळाव्याचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन ८ जूनला येथे केले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी दहाला हा मेळावा होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यामध्ये कारपेंटर २५ जागा (शैक्षणिक अर्हता आयटीआय, वयोमर्यादा १८ ते ३५, अनुभव किमान १ वर्ष). असिंस्टंट कारपेंटर २५ जागा (दहावी पास, वय १८ ते ३५, किमान २ वर्षे तत्सम अनुभव), सिव्हील इंजिनिअर ज्युनिअर २ जागा (बीई सिव्हील, किमान २ वर्षे तत्सम अनुभव), सिलेशनशिप मॅनेजर १२ जागा (पदवीधर आवश्यक, वयोमर्यादा १८ ते २७) आहे. जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी पोर्टलवर स्वत:च्या लॉगीन आयडीने संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज केलेल्या उमेदवारांची उद्योजक ८ जूनला सकाळी दहाला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयात मुलाखत घेऊन अटी-शर्तींनुसार अंतिम निवड केली जाईल. जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.