संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे
शंभर बेड्समध्ये श्रेणीवर्धन
दाभोळ ः दापोली उपजिल्हा रुग्णालयात नवीन इमारत बांधण्यात येणार असल्याने जुनी इमारत पाडण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाचे ५० बेड्सवरून १०० बेड्समध्ये श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपूर्वी मंजूर झाला होता; मात्र त्यासाठी निधीची तरतूद करण्यात न आल्याने हे काम मागे पडले होते. आमदार योगेश कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघातून विजय मिळवल्यावर या प्रश्नांवर प्रथम लक्ष दिले व या कामासाठी निधीची तरतूद शासनाकडून करून घेतली. आता या कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार असून, त्यासाठी जुनी इमारत पडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या संख्येतही वाढ होणार असल्याने उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णांना उपचारासाठी अन्य ठिकाणी पाठवले जाणार नाही.