चिपळूण ः चिपळुणात 29 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  चिपळुणात  29 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
चिपळूण ः चिपळुणात 29 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

चिपळूण ः चिपळुणात 29 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

sakal_logo
By

चिपळुणात २९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

चिपळूण, ता. ३० ः उन्हाळ्याची दाहकता वाढतच असतानाच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. सध्या तालुक्यातील १४ गावातील २९ वाड्यांना टँकरद्ववारे पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरीचे स्रोत आटल्याने या गावांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
तालुक्यात उन्हाळ्याच्या कालावधीत दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा बसतात. गावोगावी पाणीयोजना राबवल्या तरी पाणीटंचाईची समस्या संपलेली नाही. सद्यःस्थितीला तालुक्यातील अडरे, सावर्डे, कोंडमळा, टेरव, गुढे, अनारी, कादवड, खडपोली, गाणे, आकले, करंबवणे, कळकवणे, नारदखेरकी आणि डेरवण येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध नाहीत. पुर्वीचे टँकर भंगारात निघाले आहेत. त्यामुळे २ खासगी टॅंकरच्या माध्यमातून १४ गावातील २९ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आकले, वेहेळे, नारदखेरकी, परशुराम या चार गावांनी १५ दिवसांपूर्वी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. पाणी उपलब्धतेबाबत संयुक्त पाहणी झाल्यानंतर या चारही गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दीर्घ कालावधीनंतर जलजीवन मिशन योजना राबवली जात आहेत.
तालुक्यातील ३० ते ४० गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची कामे सुरू आहेत. जिथे मुबलक पाणी आहे तेथून पाणी उचलण्यात येत आहे. त्यामुळे या योजना मार्गी लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. पावसाळा सुरू होई तोपर्यंत २९ वाड्यांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. पाऊस लांबल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.