
निधन वृत्त
05890
प्रा. अनंत पटवर्धन यांचे देहदान
साडवली ः देवरूख आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे निवृत्त प्रा. अनंत केशव पटवर्धन (वय ८४) यांचे मंगळवारी (ता. ३०) सकाळी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार डेरवण हॉस्पिटल येथे देहदान केले. प्रा. पटवर्धन यांनी सुरवातीला आरोग्यखाते तसेच महसूल खात्यात नोकरी केली. 1972 ला देवरूख महाविद्यालयाची स्थापना झाल्यावर ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ते समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे अध्ययन करत होते. आपल्या उत्पन्नाचे त्यांनी पाच भाग केले होते. एक भाग गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी, मंदिरांसाठी ट्रस्ट स्थापन करून सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली होती. पाथेय अनंताचे हे त्यांनी आत्मकथन लिहिले आहे. धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांनी या कार्यातही सढळ हस्ते मदत केली. आपल्या देहाचाही उपयोग शिकण्यासाठी व्हावा, या हेतूने त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. प्रा. पटवर्धन यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नात असा परिवार आहे.