संक्षिप्त

संक्षिप्त

खेडला आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती
खेड ः धनगर समाजाचे आराध्य दैवत व हिंदू धर्म रक्षणासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन ३१ मे रोजी करण्यात आले आहे. भरणे गवळवाडी येथील महाराष्ट्र कोकण धनगर विकास मंडळाच्या समाज भवन कार्यालय (रिलायन्स पेट्रोलपंपासमोर) सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, मान्यवरांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांवर मार्गदर्शन, १२वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांचे स्वागत व स्नेहभोजन इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष पी. डी. गोरे व सचिव गणपत गोरे यांनी केले आहे.


बिजघरमध्ये मराठा क्रांती स्वराज्य
संघटनेच्या मुख्यालयाचे उद्घाटन
खेड ः तालुक्यातील बिजघर येथील साईमंदिराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या राष्ट्रीय मुख्यालयाचे उद्घाटन प्रांताधिकारी राजश्री मोरे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या प्रसंगी माजी आमदार संजय कदम, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदानंद भोसले, राष्ट्रीय सरचिटणीस विजय कदम, बडोद्याचे राष्ट्रीय संस्थापक सदस्य प्रदीप मोरे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. संध्या राणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद भोसले, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गुरूनाथ यशवंतराव, नगर जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, श्रद्धा पाटील, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली गलगटे, राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, राज्य सरचिटणीस संजय जाधव आदी उपस्थित होते.

मराठा क्रांती स्वराज्य
कोकण प्रदेश सरचिटणीसपदी चाळके
खेड ः मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कोकण प्रदेश सरचिटणीसपदी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोहन चाळके यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंद भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष उज्ज्वलसिंह गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. आनंद भोसले यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. चाळके यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील जाणकार असून, महाविद्यालयीन दशेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नेतृत्व केले आहे. या निवडीबद्दल संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


''वंदे भारत''ला खेड स्थानकात थांबा न दिल्यास आंदोलन

खेड ः खेड रेल्वेस्थानक खेडसह दापोली, मंडणगड तालुक्यातील प्रवाशांनी नेहमीच गजबजलेले असते. या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर नव्याने धावणाऱ्या मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला येथील स्थानकात थांबा मिळणे आवश्यक आहे. या मागणीची दखल न घेतल्यास प्रवाशांसह आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. आनंद भोसले यांनी दिला आहे. तसे निवेदन येथील रेल्वे स्थानकप्रमुख नीलेश मोरे यांना देण्यात आले. खेडसह दापोली, मंडणगड तालुक्यातील प्रवासी रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्यासाठी येथील स्थानकास पसंती देतात. वंदे भारत एक्स्प्रेसला खेड स्थानकात थांबा न मिळाल्यास प्रवाशांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला येथील स्थानकात थांबा देऊन प्रवाशांना दिलासा देण्याची आग्रही मागणी करत दखल न घेतल्यास आंदोलन छेडावे लागेल. या प्रसंगी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंद भोसले, तालुकाध्यक्ष विवेक कदम, शहराध्यक्ष रोहन विचारे, जिल्हा उपाध्यक्ष विजय येरूणकर, सचिव रामचंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com