माड अचानक पेटल्याने सावंतवाडीत तारांबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माड अचानक पेटल्याने
सावंतवाडीत तारांबळ
माड अचानक पेटल्याने सावंतवाडीत तारांबळ

माड अचानक पेटल्याने सावंतवाडीत तारांबळ

sakal_logo
By

05979
सावंतवाडी ः नारळाच्या झाडाला लागलेली आग अटोक्यात आणताना अग्निशमन बंब.

माड अचानक पेटल्याने
सावंतवाडीत तारांबळ
सावंतवाडी ः माडाला अचानक आग लागण्याची घटना उभाबाजार शिवाजी पुतळा परिसरात आज घडली. परिसरातील काहींनी माडाखाली आग लावली होती. ही आग भडकल्यामुळे झाडाच्या शेंड्यावरील सुक्या झावळ्यांनी पेट घेतला. माड अचानक पेटत असल्याचे दिसल्याने परिसरात तारांबळ उडाली. तात्काळ पालिकेच्या बंबाला पाचारण करत आग अटोक्यात आणली. नारळाचे हे झाड भरवस्तीत असून आजूबाजूला घरे असल्याने बंब तिथपर्यंत पोहचू शकला नाही; मात्र पाईपच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
..................
गैरवर्तनप्रकरणी एकावर गुन्हा
देवगड ः न्यायालयाच्या आवारात गैरवर्तन केल्याप्रकरणी तालुक्यातील मोंड-तळीवाडी येथील एका युवकावर येथील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. याबाबत येथील पोलिसांनी माहिती दिली.