डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचा 85.68 टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचा 85.68 टक्के निकाल
डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचा 85.68 टक्के निकाल

डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचा 85.68 टक्के निकाल

sakal_logo
By

डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचा ८५.६८ टक्के निकाल
मुली ठरल्या सरस ; हर्ष सावंत, महेक फिरफिरे व सादिया देसाई प्रथम
चिपळूण, ता. ३१ः येथील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८५.६८ टक्के लागला आहे. या परीक्षेत विज्ञान शाखेतून हर्ष सावंत, वाणिज्य शाखेत महेक फिरफिरे तर कला शाखेत सादिया देसाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सानिका कदम हिने अकाउटन्सी विषयात तर रोशनी वाळंज या विद्यार्थिनीने संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केले आहेत. विशेष म्हणजे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलीच सरस ठरल्या.
बारावी परीक्षेत डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतून एकूण ९०८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा ७५.६५ टक्के, वाणिज्य ९२.३४ टक्के, कला ९०.८५ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत हर्ष सावंतने (८८.८३ टक्के) प्रथम, चिन्मयी केळकर (८८) द्वितीय, आर्या कुलकर्णी (८४.३३) तृतीय, राज निकम (७९.६६) चतुर्थ तर रोशनी वाळंज व तनुजा शिंदे यांनी प्रत्येकी ७९.१७ टक्के प्राप्त करत पाचवा क्रमांक पटकावला आहे.
वाणिज्य शाखेत महेक फिरफिरे (९४.६७) प्रथम, श्रावणी खेडेकर (९४.५०) द्वितीय, सानिया कदम (९३.८३) तृतीय, अक्सा हुसैनी (९३.६७) चतुर्थ तर सानिया ठसाळे व सृष्टी शिंदे यांनी प्रत्येकी ९३.१७ टक्के मिळवत पाचवा क्रमांक पटकावला. कला शाखेत सादिया देसाई (९३.३३) प्रथम, सई जोशी (९१.३३) द्वितीय, तन्वी जोगळेकर (९०.३३) तृतीय, वैष्णवी झुजम (८८.१७) चतुर्थ तर अरबिना खान (८६.१७) टक्के प्राप्त करत पाचवा क्रमांक मिळवला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बापूसाहेब भिडे, चेअरमन मंगेश उर्फ बाबू तांबे, व्हा. चेअरमन ॲड. जीवन रेळेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नामदेव तळप, पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी, प्रबंधक अनिल कलकुटकी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.