राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या प्रशिक्षणाला 73 शेतकरी उपस्थित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या प्रशिक्षणाला 73 शेतकरी उपस्थित
राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या प्रशिक्षणाला 73 शेतकरी उपस्थित

राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या प्रशिक्षणाला 73 शेतकरी उपस्थित

sakal_logo
By

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डातर्फे
७३ शेतकऱ्यांना प्रशिक्षण
दाभोळ, ता. ३१ः कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वामीनाथन् सभागृहामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाच्यावतीने जाणीव, जागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम झाला. प्रशिक्षणासाठी कणकवली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, खेड, दापोली आणि मंडणगड येथून ७३ शेतकरी, उद्योजक उपस्थित होते.
राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाच्या विविध योजनांची माहिती बोर्डाचे उपसंचालक डॉ. ए. के. सिंग यांनी सादरीकरणाद्वारे दिली. तसेच कृषिक्षेत्राशी संबंधित बॅंकांच्या विविध योजनांची माहिती बॅंक ऑंफ इंडियाचे विकल्प यांनी आणि कृषी अधिकारी किरण पोळ यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने अमोल क्षीरसागर यांनी दिली. काजू उत्पादन तंत्रज्ञान यावर डॉ. योगेश परूळेकर आणि आंबा उत्पादन पंचसुत्री यावर डॉ. महेश कुळकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्याक्रमाला उपस्थित असलेल्या शेतकरी, उद्योजक यांनी चर्चात्मक प्रश्नोत्तराने माहिती समजून घेण्यात आली.
डॉ. ए. के. सिंग, उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप, प्रभाकर अमृते, कृषी अधिकारी जयश्री रेवाळे उपस्थित होते. कृषी विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय बागवानी मंडळ या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेबरोबर विद्यापीठ निश्चित स्वरूपात विविध उपक्रमांचे आयोजन करेल आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी योगदान देईल, असे सांगितले.