
कृषी विकास अधिकारीपदी जानबा झगडेंची नियुक्ती
06076
जानबा झगडे
कृषी विकास अधिकारीपदी
जानबा झगडे यांची नियुक्ती
सिंधुदुर्गनगरी, ता. ३१ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारीपदी जानबा झगडे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद गेले अनेक महिने रिक्त होते. या पदावर गेली काही महिने विरेश अंधारी हे पदभार सांभाळत होते. नव्याने रुजू झालेले झगडे हे यापूर्वी पाली सुधागड (जि. रायगड) येथे तालुका कृषी अधिकारी या पदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी कृषी आयुक्तालय पुणे येथे फलोत्पादन व त्यापूर्वी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सहा वर्षे काम केले आहे. शासनाने नुकत्याच कृषी अधिकाऱ्यांच्या केलेल्या पदोन्नतीत झगडे यांची तालुका कृषी अधिकारी पदावरून पदोन्नतीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विकास अधिकारी या पदावर नियुक्ती केली. त्यानी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून कृषी हंगामात विविध योजनांना गती देण्यासाठी समर्थपणे कार्यरत राहू. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना राबवू, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या नियुक्तीचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने स्वागत होत आहे.