पावसाळ्यात करुळ घाट ''राम भरोसे''

पावसाळ्यात करुळ घाट ''राम भरोसे''

wt११५.jpg
०६२८५
करूळः घाटरस्त्याकडेची गटारे दगड-मातीच्या गाळाने भरलेली आहेत.
swt११४.jpg
०६२८४
करूळः घाटात दरडी कोसळतील अशी अशाप्रकारे संभाव्य पाच ठिकाणे आहेत.

पावसाळ्यात करुळ घाट ‘राम भरोसे’
ना गटारांची साफसफाई ना दरडींचे नियोजनः सर्वाधिक वाहतूकीचा मार्ग
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १ः ना गटारांची साफसफाई, ना कोसळलेल्या दरडी हटविण्याचे नियोजन अशीच काहीशी अवस्था सर्वाधिक वाहतूक असलेल्या करूळ घाटमार्गाची झाली आहे. त्यामुळे यावर्षी देखील करूळ घाटमार्गावरील वाहतूक बेभरवशाची ठरणार आहे. मान्सून आगमनाला अवघे सहा ते सात दिवस शिल्लक असताना करूळ घाटातील कामे जैसे थे आहेत. मंजूर असलेल्या क्राँक्रीटीकरणच्या कामाला मुर्तस्वरूप प्राप्त न झाल्यामुळे या घाटरस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे.
जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मान्सून अवघ्या सहा ते सात दिवसांवर आला आहे. परंतु, पावसाळ्यापूर्वी करावयाची कोणतीही कामे करूळ घाटांमध्ये झालेली दिसून येत नाहीत. गटारांमध्ये गेल्या पावसाळ्यात पडलेला दगड-मातीचा ढिगारा जागोजागी तसाच पडून आहे. याचा मोठा परिणाम पावसाळ्यात घाटरस्त्यातील वाहतूकीवर होणार आहे. डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याचा निचरा किंवा त्याला मार्ग न मिळाल्यामुळे ते सर्व पाणी रस्त्यावर येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय याच पाण्यामुळे रस्ता खचण्याची अधिक शक्यता आहे. करूळ घाट यापूर्वी अनेकदा याच कारणामुळे रस्ता खचण्याचे प्रकार घडलेले आहेत. मात्र, त्यातून कोणताही बोध राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणने घेतलेला दिसत नाही. या घाटमार्गावर दरीकडील बाजूला अनेक ठिकाणी मोकळीच आहेत. त्याठिकाणी संरक्षक कठडे, क्रॅश बॅरियर्स उभे केलेले नाहीत. दरडी रोखण्यासाठी गेल्या कित्येक वर्षात उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका या मार्गावर कायम आहे. त्यामुळे करूळ घाटातील वाहतूक यावर्षी देखील बेभवरवशाचीच ठरण्याची शक्यता आहे.
------------
चौकट
देखभाल दुरूस्तीतील क्लिष्टता
तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे-गगनबावडा मार्गावरील २१ किलोमीटर लांबीचा रस्ता काँक्रीटीकरणासाठी शासनाने २४९ कोटी रूपयांची मंजूरी दिली असून या कामांची निवीदा प्रकिया सुरू आहे. खरे तर जानेवारी-फेब्रुवारीपासून निविदेचा हा घोळ सुरू आहे. २१ किलोमीटरमध्ये १० किलोमीटर करूळ घाटरस्त्याचा समावेश आहे. या महामार्गावर कोट्यावधीचा निधी मंजूर झाल्यामुळे किरकोळ देखभाल दुरूस्ती खर्चासाठी निधी करण्यास महामार्ग प्रधिकरण दुर्लक्ष करीत आहे. मक्ता निश्चित झाला तर देखभाल दुरूस्तीचे काम त्या कंपनीला करावी लागणार आहेत. परंतु, हीच प्रकिया लांबल्यामुळे घाटरस्त्यांची अवस्था मात्र दयनीय झाली आहे.
-------
कोट
करूळ घाटातील विविध कामांचा प्रस्ताव आम्ही फेब्रुवारीमध्येच वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, काँक्रीटीकरणाचे काम मंजूर असल्यामुळे त्याच मार्गावर अन्य कामांसाठी वेगळा प्रस्ताव मंजूर होत नाही. त्यामुळे घाटरस्त्यांतील विविध कामे आहेत, ती प्रधिकरणमार्फत करण्यात येणार आहेत. याशिवाय जर दरड कोसळली तर ती प्रधिकरणकडूनच हटविली जाईल.
- अतुल शिवनिवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण
---------
पाँईटर्स
* तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट
* सर्वाधिक वाहतुकः ३२ हजार मेट्रीक टन
* दरडी कोसळणारी ठिकाणेः पाच
* रस्ता खचणारी ठिकाणेः चार
* रस्त्याकडेची गटारे दगड मातीने भरलेली
* पावसाळ्यात घाटरस्ता उखडण्याची शक्यता
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com