
पाटकर घर-वाफोली कॉर्नर रस्ता डागडुजीस अखेर सुरुवात
swt111.jpg
06306
बांदाः शहरातील गवळीटेंब येथे गुरुवारपासून रस्त्याची डागडुजी सुरु करण्यात आली. (छायाचित्रः निलेश मोरजकर)
पाटकर घर-वाफोली कॉर्नर
रस्ता डागडुजीस अखेर सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः शहरातील गवळीटेंब ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आज डॉ. रुपेश पाटकर घर ते वाफोली रस्ता कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीस सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी सुरु करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
येथील गवळीटेंबवाडी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला या रस्त्यासंदर्भात निवेदन दिले होते. हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त असून वाहतुकीस धोकादायक बनलेला असल्याचे त्यात नमूद केले होते. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी न झाल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा नेण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. याची दखल घेऊन बांदा ग्रामपंचायत प्रशासनाकडून आजपासून या रस्त्याच्या डागडुजीच्या कामास सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यानंतर गवळीटेंबवाडी, शेटकरवाडी व गडगेवाडी या तिन्ही वाडीतील मुख्य रस्ते हे हॉट मिक्स करून देण्यात येतील, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले. यावेळी वाडीतील ग्रामस्थ कृष्णा देसाई, डॉ. रुपेश पाटकर, भाऊ वळंजु, गोविंद नाईक, अर्चना आंबेलकर, बाबी आईर, अभिजीत देसाई, स्वानंद पवार, राजन नाईक, पंकज देसाई, सिद्धेश वराडकर, व्यंकटेश ऊरुमकर, शोभना नाईक, मुकुंद सावंत, उमेश तोरस्कर, विकी सावंत, गुरु कल्याणकर, श्रुती वळंजू, वैदेही देसाई आदी उपस्थित होते.