सहकार जगणारे प्रभाकर आरेकर

सहकार जगणारे प्रभाकर आरेकर

श्री. प्रभाकर आरेकर वाढदिवस विशेष---डोके

फोटो ओळी
-rat१p१४.jpg- KOP२३M०६३०१ सहचारिणी सौ. स्मिता यांच्याबरोबर प्रभाकर आरेकर
-rat१p१५.jpg-KOP२३M०६३०२ भंडारी समाजरत्न पुरस्कार स्वीकारताना प्रभाकर आरेकर
-rat१p१६.jpg-KOP२३M०६३०३ प्रभाकर आरेकर यांना ''सकाळ'' माध्यम समुहाच्या आयडॉल ऑफ महाराष्ट्र (चेअरमन) पुरस्काराने गौरवताना सहकार क्षेत्रातील तज्ञ विद्याधर अनास्कर
-ra१p१७.jpg- KOP२३M०६३०४ मुले, सुना, मुली, जावई आणि नातवंडासोबत सौ. स्मिता व श्री. प्रभाकर आरेकर
----------------

इंट्रो

बँकिंग व सहकार क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर प्रभाकर आरेकर यांनी श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची २० वर्षांपूर्वी स्थापना केली. पहिल्या दिवसापासून पारदर्शकता, विश्वासार्हता, सुरक्षितता आणि व्यावसायिकता या चार सुत्रांवर पतसंस्थेची वाटचाल सुरू झाली. गेल्या वीस वर्षात या पतसंस्थेने १७ शाखा आणि २ कलेक्शन सेंटरद्वारे त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण पादाक्रांत केला आहे. पतसंस्थेद्वारे जनतेच्या आर्थिक विकासाचे धोरण राबवणाऱ्या प्रभाकर आरेकर यांची ही वाटचाल निश्चितच गौरवास्पद आहे. शुक्रवारी (ता. २) त्यांचा वाढदिवस आहे. या यशस्वी वाटचालीमागील परिश्रम आणि व्हीजन काय आहे याचा वेध त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने.....

सहकार जगणारे प्रभाकर आरेकर

गुहागर तालुक्यातील चिखली हे मुळ गांव असणाऱ्या प्रभाकर आरेकर यांनी बी. कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर १९७१ मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीला सुरवात केली. ३५ वर्ष इतक्या प्रदीर्घ कालावधीत त्यानी नोकरीबरोबरच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पतसंस्थेचे आठ वर्ष संचालक म्हणून काम केले. किसान स्टाफ सोसायटीचे ते अध्यक्ष होते. गुहागर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या निमित्ताने त्यांना सहकार क्षेत्रातील अनेक चांगल्या-वाईट घटना जवळून अनुभवता आल्या. नोकरीच्या कालखंडातच सहकार क्षेत्रातील डिप्लोमा (जीडीसी ॲण्ड ए) त्यांनी पूर्ण केला. ३५ वर्षांच्या नोकरीमध्ये सहकारातून विकास कसा साध्य करता येतो, सहकाराची बलस्थाने कोणती, सहकारी संस्था तोट्यात का जातात, अशा अनेक बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केल्यावर त्यांचा सहकारावरील विश्वास दृढ झाला.
नोकरीत असतानाच सहकार क्षेत्राला बळ मिळेल असे काहीतरी वेगळं करून दाखवावं, असे विचार त्यांच्या मनातून येत होते. ही इच्छा त्यांनी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेत काम करणाऱ्या मित्रांना बोलून दाखवली. त्यातूनच २००२ मध्ये पतसंस्थेचा जन्म झाला. १३ जून २००२ रोजी चिपळूणमध्ये श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. भेंडीनाका येथील केवळ २०० चौ. फुटाच्या मुख्य कार्यालयातून संस्थेच्या कामकाजाला सुरवात केली.
निवृत्तीनंतर आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत व्यवसायवृद्धीसाठी समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेणे, गटबैठकांमधून सभासद संख्या वाढवणे, अशी अनेक कामे सुरू केली. इथे जिल्हा बँकेत नोकरी करताना तयार झालेली स्वच्छ प्रतिमा उपयोगी पडली. अल्पावधीत त्यांच्या मेहनतीला यश आले. अवघ्या अडीच वर्षात समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेने चिपळूण शहराबाहेर उमरोली येथे आपली पहिली शाखा कार्यान्वित केली. संस्थेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांमध्ये ठेवीच्या सुरक्षिततेबाबत विश्वास निर्माण केल्याने ठेवीं सातत्याने वाढू लागल्या. पारदर्शक व्यवहार आणि व्यावसायिकता जपत श्री समर्थ भंडारी प्रगती करू लागली.
चिपळूण तालुका मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेने सहकार खात्याकडे संपूर्ण कोकण कार्यक्षेत्राचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव तत्काळ मान्य झाला. लगेचच पतसंस्थेने कार्यविस्ताराचे धोरण आखले. चिपळूण उमरोलीपाठोपाठ खेर्डीत शाखा सुरू केली. चिपळूण तालुका ओलांडत गुहागर, शृंगारतळी अशा शाखा २००७ मध्ये सुरू झाल्या. २०१६ मध्ये शिरगांव, सावर्डे, २०१७ मध्ये देवरूख, दापोली, दाभोळ, २०१९ मध्ये संगमेश्वर व माखजन, २०२० मध्ये रत्नागिरी व हर्णै आणि २०२२ मध्ये आबलोली, मंडणगड या शाखा सुरू झाल्या. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याबाहेर थेट नवी मुंबईतील नेरूळ येथेही श्री समर्थ भंडारी पतसंस्थेने नोव्हेंबर २०२२ मध्ये शाखा सुरू केली. आज १७ शाखा व मिरजोळी आणि रत्नागिरी येथील २ कलेक्शन सेंटरद्वारे पतसंस्थेचे कामकाज सुरू आहे. या सर्व शाखांमध्ये वीजबिल भरणा, एटीएम, मनी ट्रान्सफर यासारख्या सेवाही दिल्या जातात.
गेल्या ६ वर्षात प्रत्येक आर्थिक वर्षात पतसंस्थेने अ ऑडिट वर्ग मिळवला आहे. १४ टक्के लाभांश देणारी पतसंस्था असा नावलौकिक कमावला आहे. प्रभाकर आरेकर यांच्या नेतृत्वामध्ये सहकार क्षेत्रात स्थापनेपासून सातत्याने नफ्यात असणारी, भागधारकांचे समाधान करणारी, दरवर्षी वाढता व्यवसाय करणारी, यशस्वीतेकडे वाटचाल करणारी श्री समर्थ भंडारी पतसंस्थाही खऱ्या अर्थाने आयडॉल बनली आहे.
--------------------------------
चौकट
सामाजिक कार्यातही सहभाग

आर्थिक क्षेत्रात काम करणारी श्री समर्थ भंडारी पतसंस्था सामाजिक कार्यातही सहभागी होते. दरवर्षी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार वार्षिक सर्वसाधारण सभेत केला जातो. कोरोना काळात कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयाला विविध सोयीसुविधांसाठी पतसंस्थेने आर्थिक मदत केली. २०२१ च्या चिपळूणच्या महापुरात तत्परतेने आवश्यक मदत पतसंस्थेने केलीच शिवाय छोट्या व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी लवचिक धोरण ठरवून कर्ज पुरवठा केला.
--------------------------------
चौकट १
दृष्टिक्षेपात समर्थ भंडारी पतसंस्था (मार्च २०२३ अखेर)
एकूण शाखा : १७
एकूण सभासद : ६५०८
वसूल भागभांडवल ः ७ कोटी ९९ लाख ५८ हजार
ठेवी ः १५३ कोटी ४१ लाख ३१ हजार
कर्ज व्यवहार ः १२२ कोटी ९२ लाख ५५ हजार
निधी ः ९ कोटी ५० लाख ११ हजार
गुंतवणूका ः ५२ कोटी ३८ लाख ७८ हजार
निव्वळ नफा ः ४ कोटी ३ लाख ६६ हजार
खेळते भांडवल ः १८५ कोटी ५२ लाख ३ हजार
लाभांश टक्केवारी ः १४ टक्के
--------------------------------
कोट
१९७१ च्या काळात राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी सहजशक्य होती; मात्र सहकार क्षेत्राचे आकर्षण असल्याने अल्प पगार असूनही जिल्हा बँकेत नोकरी स्वीकारली. सदाशेठ आरेकर, महादेवराव शिर्के यांच्यासारख्या तळमळीने, अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीने काम करणाऱ्या अनेकांमुळे सहकाराची ताकद कळली. या नोकरीमुळे तळागाळातील माणसांपर्यंत पोचल्याने त्यांची गरजही कळली. आमच्यावरील विश्वास, आमची कार्यशैली, आर्थिक शिस्त यातून पतसंस्था उभी राहिली आणि प्रगतीची घोडदौड करत आहे. हे मध्यवर्ती बँकेतून मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीचे यश आहे.
- प्रभाकर आरेकर, चेअरमन, श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था

चौकट ३
हे मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार

श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर आरेकर यांना ''सकाळ'' माध्यम समुहाने सप्टेंबर २०२२ मध्ये आयडॉल ऑफ महाराष्ट्र (चेअरमन) हा पुरस्कार देऊन गौरवले. इस्लामपूर ट्रस्टचा सहकार क्षेत्रासाठी असलेला नॅशनल युनिटी ॲवॉर्डही प्रभाकर आरेकर यांना मिळाला आहे. सहकार क्षेत्रात सचोटीने दीर्घकाळ कार्य करत असल्याबद्दल भंडारी एकिकरण समितीने भंडारी समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com