
रत्नागिरी ः टुडे पान 1 संक्षिप्त पट्टा
राजापूर कुणबी पतपेढीसाठी
४६ उमेदवारी अर्ज दाखल
राजापूर ः राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तेरा जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज १५ जूनपर्यंत मागे घेण्याचा कालावधी असून १६ जूनला सकाळी ११ वा. निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. २५ जूनला मतदान घेतले जाणार आहे, तर मतमोजणी २६ जूनला मतमोजणी होवून निकाल घोषित केला जाणार आहे.
-------------------
नाट्यरंभ संस्थेतर्फे
गुरुवारी प्रयोगमेळा
रत्नागिरी ः नाट्यक्षेत्रात गेली तीन वर्षे कार्यरत असणाऱ्या नाट्यरंभ रत्नागिरी या संस्थेतर्फे ८ जून ला सायंकाळी सात वाजता शहरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात ''प्रयोगमेळा'' हा तीन एकांकिकेच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रंगभुमीवर सामाजिक समस्या मांडणाऱ्या तसेच राज्यात विविध स्तरावर गाजलेल्या एकांकिका प्रयोगमेळ्यातून सादर होणार आहेत. यावर्षी नाट्यसमर्थ, गोरेगाव- मुंबई निर्मित पानंद ही एकांकीका सादर करणार आहेत तर सपान नाशिक निर्मित ''ज्याला कळलं'' आणि वायएफएफ रत्नागिरी निर्मित ''नर्मदे हर'' अशा तीन निमंत्रीत एकांकीका होणार आहेत. रसिकांनी या एकांकिकांचा आनंद घ्यावा असे आवाहन नाट्यारंभ या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
श्रीराम मंदिरात
योग प्रशिक्षणस प्रतिसाद
रत्नागिरी ः येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा तर्फे दर सोमवारी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत स्त्री पुरुष नागरिकांसाठी शिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याला सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती श्री राम मंदिर जेष्ठ नागरिक कट्टा संघाचे मुख्य संयोजक अण्णा लिमये आणि सुरेंद्र घुडे यांनी दिलीठाणे येथील श्री अंबिका योगाश्रम या संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे हा योग शिक्षण वर्ग चालविला जात असून त्यामध्ये श्रीमती स्मिता सुरेश साळवी, श्रीमती वैशाली विजय जोग, श्रीमती सुरेखा डाफळे, श्री. विवेक विष्णू जोशी हे प्रशिक्षक मार्गदर्शन करीत आहेत. रत्नागिरी शहरातील आणि परिसरातील सर्व वयोगटातील स्त्री पुरुष नागरिकांनी या मोफत योग शिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री राम मंदिर जेष्ठ नागरिक कट्टा संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे
-------
लोवलेत पुरस्कार वितरण
साडवली : महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा मानाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार लोवले ग्रामपंचायत तर्फे अंगणवाडी सेविका श्रीमती सुखदा संजय शिंदे व आशासेविका सौ. संपदा संतोष दोरकडे यांना सरपंच सौ. ऋतुजा कदम यांच्या हस्ते देण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ ५०० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी सदस्य, ग्रामसेवक अभिनंदन पाताडे, ग्रामपंचायत कर्मचारी, लोवले ग्रामस्थ बंधू- भगिनी व विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सरपंच ऋतुजा कदम यांनी पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले.