समाज हितासाठी नेहमीच कार्यरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाज हितासाठी नेहमीच कार्यरत
समाज हितासाठी नेहमीच कार्यरत

समाज हितासाठी नेहमीच कार्यरत

sakal_logo
By

swt117.jpg
M06331
देवगडः येथे उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला. (छायाचित्र ः वैभव केळकर)

समाज हितासाठी नेहमीच कार्यरत
नंदकुमार घाटेः देवगडात वाढदिवस उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ः प्रामाणिक व निःस्वार्थीवृत्तीने समाजसेवा तसेच राजकारण केल्यास जनतेकडून त्याची नक्की पोचपावती मिळते. स्थानिक विकासामध्ये कधी राजकारण येऊ देता नये. समाज हितासाठी आपण यापुढेही कार्यरत राहणार असल्याची ग्वाही येथील तालुका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक नंदकुमार घाटे यांनी आज येथे दिली. तरूणांनी शिक्षणामध्ये प्रगती साधली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे यांचा वाढदिवस तालुका पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री. घाटे बोलत होते. यावेळी झालेल्या उच्चमाध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आदिती मिलिंद कुबल, वरूण धाकू मालपेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी येथील देवगड अर्बन बँक संचालक समीर पेडणेकर, बाबा आचरेकर, भाई आचरेकर, दिवाकर परब, चंद्रकांत पाळेकर, शरद शिंदे, प्रशांत शिंदे, विनायक जोईल, बंटी कदम, प्रदीप मुणगेकर, रमाकांत पडणेकर, शामकांत शेटगे, कृष्णा परब, प्रकाश जोईल, प्रमोद कोयंडे, दिनेश मेस्त्री, जयराम कदम, बंटी वाडेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विविध मान्यवरांनी श्री. घाटे यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. श्री. घाटे यांनी, विकासामध्ये आजवर कधीही राजकारण आणले नाही. आपल्या क्षमतेनुसार आजवर शहराच्या विकासामध्ये योगदान राहिले असून यापुढेही शहराच्या विकासासाठी कार्यरत राहू असे सांगुन शहरातील शिक्षण, आरोग्य, सहकार क्षेत्रातील विकासाचा धावता आढावा त्यांनी घेतला. सुत्रसंचालन मुणगेकर यांनी केले.