
आशियेतील दोन महिलांचा सन्मान
kan12.jpg
M06346
आशिये : येथील महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करताना सरपंच महेश गुरव.
आशियेतील दोन महिलांचा सन्मान
कणकवली, ता. १ : महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आशिये गावातील दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आशिये ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यात सरपंच महेश गुरव यांच्याहस्ते आशिये गावात बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केल्याबद्दल निधी पुजारे आणि सावित्री ठाकूर या दोन महिलांचा सन्मान अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन करण्यात आला. या कार्यक्रमावेळी उपसरपंच संदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य विशाखा गुरव, संजना ठाकूर, अंगणवाडी सेविका तनया बाने, स्नेहल कासले, आशा स्वयसेविका गार्गी नेमळेकर, ग्रामसेवक राकेश गोवळकर, सामूहिक आरोग्य अधिकारी ऐश्वर्या गावडे आदी उपस्थित होते.