गुहागर-जाहिरात लेख

गुहागर-जाहिरात लेख

rat०११९.txt

बातमी क्र. १९ (टुडे पान ३ साठी जाहिरात लेख)
(टीप- पुरवणीतील पहिल्या लेखाला मयुरेश पाटणकर यांचे नाव लावावे. तसेच पुरवणी संकलन ः मयुरेश पाटणकर, गुहागर असे टाकावे.)

फोटो ओळी
-rat१p२०.jpg- KOP२३M०६३४४ सुभाषराव चव्हाणअभ्यासू व्यक्तिमत्व ः प्रभाकर आरेकर

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेचे संस्थापक प्रभाकर आरेकर हे अभ्यासू वृत्तीचे आहेतच, त्याचबरोबर चिकित्सकही आहेत. वरिष्ठांनी सांगितले म्हणून आंधळेपणाने काम करायचे ही त्यांची वृत्ती कधीच नव्हती. त्या कामातील सर्व बारीकसारीक तपशील कळेपर्यंत, त्यांच्या शंकांचे निरसन होईपर्यंत ते पाठपुरावा करायचे. त्यामुळे एखाद्या निर्णयातील उणीवही लक्षात येत असे. काही वेळा मी काही निर्णय धाडसाने घ्यायचो. माझा निर्णय पटो अथवा न पटो एक मित्र म्हणून प्रभाकर आरेकर कायमच माझ्या सोबत राहीले. जिल्हा बँकेतील नोकरी, निवृत्तीनंतर मी सुरू केलेली पतसंस्था, माझे सामाजिक काम या सर्वांमध्ये प्रभाकर आरेकर यांची साथ मला कायम राहिली.
------

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १९७१ ते २००५ अशी ३४ वर्ष आम्ही एकत्र काम केले. चांगले मित्र आणि जवळचे सहकारी अशी आमची जिल्हा बँकेत ओळख निर्माण झाली होती. बँकेतील कोणतेही क्लिष्ट काम असो आम्ही दोघेही ते यशस्वी करत असू. जिल्हा बँकेत अनेकवेळा जिथे सुभाषराव तिथे प्रभाकर हे चित्र पाहायला मिळत असे.
जिल्हा बँकेतील नोकरीच्या निमित्ताने आम्हाला सहकार क्षेत्रातील चांगल्या गोष्टी समजल्या. त्याचप्रमाणे खाचखळगेही लक्षात आले. त्याचा फायदा आज दोघांनाही पतसंस्था चालवताना होत आहे. जिल्हा बँकेतील नोकरीमधून निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मी पतसंस्था स्थापन करण्याचा विचार बोलून दाखवला. त्यावेळीही प्रभाकर आरेकर यांनी माझ्या निर्णयाचे स्वागतच केले. माझ्यासोबत काही वर्ष कामही केले. पुढे माझे अनुकरण करत प्रभाकर आरेकर यांनी देखील श्री समर्थ भंडारी पतसंस्था सुरू केली. आज आम्ही एकाच व्यवसायात असलो तरी ५२ वर्षांत आमची दोस्ती कधी तुटली नाही. नोकरीच्या कालावधीत असलेली चिकित्सक स्वभाव, अभ्यासू वृत्ती आजही तशीच आहे. प्रभाकर आरेकर यांनी यांच्या याच गुणांच्या आधारावर पतसंस्थेला आकार दिला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा आहेतच. तसेच सहकार क्षेत्रात त्यांना अधिकाधिक योगदान देता यावे म्हणून त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच परमेश्र्वरचरणी प्रार्थना.
---सुभाषराव चव्हाण, संस्थापक अध्यक्ष, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com