कोळसुंद्यांनी मारलेल्या गुरांसाठीही भरपाई

कोळसुंद्यांनी मारलेल्या गुरांसाठीही भरपाई

फोटो ओळी
-rat३१p२३.jpg KOP२३M०६१९३ -चिपळूण ः कोळसुंद्यांनी मारलेल्या गुरांसाठीही भरपाई मिळते याची माहिती देण्यासाठी धनगर पाड्यावर झालेल्या सभेप्रसंगी उपस्थित पाड्यातील रहिवासी.

कोळसुंद्यांनी मारलेल्या गुरांसाठीही भरपाई
पाड्यांवर जागृती ; सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेचे प्रयत्न

पॉइंटर
*''जागतिक रानकुत्रा''दिनी बैठक
*धनगर बांधवांसोबत सुसंवाद
*अद्यापही बऱ्याच अंशी सहजीवन
*हातावर असलेल्या पोटाचे काय?

चिपळूण, ता. ३१ ः बिबट्याने दुभती जनावरे मारल्यानंतर प्रकरण केल्यास वन विभागाकडून योग्य वेळेत नुकसान भरपाई मिळते, तशीच भरपाई कोळसुंद्यांनी मारलेल्या गुरांसाठीही मिळते, ही माहिती कुंभार्ली घाटातील कितीतरी पाड्यांवर पोहोचलेलीच नाही. त्यामुळे होणारे नुकसान सहन करणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर असतो. ही बाब ध्यानी घेऊन रानकुत्र्यांनी दुभती जनावरे मारल्यानंतर त्वरित सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन येथील रहिवाशांना केले.
याबाबत संस्थेच्या अध्यक्षा राणी प्रभुलकर (अरणी) यांनी सांगितले, २८ मे म्हणजेच ''जागतिक रानकुत्रा'' दिनी कुंभार्ली घाटातील विविध पाड्यांसोबत सह्याद्री संवर्धन व संशोधन या संस्थेने येथील धनगर पाड्यांवरील बांधवांसोबत कुंभार्ली घाटमाथा येथे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चा सत्रामध्ये कोळसुंद्यांविषयीची सकारात्मक बाजू या बांधवांसमोर मांडण्यात आली. त्यांना असणारे धोके, त्यांचे निसर्गातील, तसेच मानवी जीवनातील स्थान याबाबत चर्चात्मक देवाणघेवाण झाली. येथील बांधवांनी त्यांच्या इतरही बऱ्याच अडचणी संस्थेपुढे मांडल्या, त्यावर चर्चेतून मार्ग सुचवले गेले. इथून पुढे मात्र कोळसुंद्यांनी दुभती पाळीव जनावरं मारल्यास वेळीच संस्थेशी संपर्क करून भरपाई मिळण्यासाठी नक्की धडपड करू असा विश्वास या बांधवांनी दिला.
रानकुत्रे किंवा कोळसुंदे हे सध्याच्या काळातील एक संकटग्रस्त आणि तितकीच दुर्लक्षित प्रजाती. वाघ-बिबट्याप्रमाणेच अन्नसाखळीमध्ये उच्च स्थानावर असणारा, पण तरीही तितकासा प्रसिद्ध नसलेला रानकुत्रा हा सह्याद्रीतील एक गोंडस जीव. एकेकाळी सह्याद्रीच्या दाट अरण्यात बागडणारा, कळपाने राहणारा, शिकार करणारा हा चपळ शिकारी कधीकाळी क्वचित नजरेस पडत असे. पण सध्या पायथ्याला असणाऱ्या मानवी वस्तीच्या आसपास वारंवार वावरताना दिसू लागला आहे. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या, आदिवासी पाड्यांवरील बांधवांसाठी हा प्राणी अगदी नेहमीच्या पाहण्यातला. रान कुत्रे आणि पाड्यावरचे बांधव यांच्यामध्ये अद्यापही बऱ्याच अंशी सहजीवन असल्याचे दिसून येते. मात्र गेले काही महिने/वर्ष इथले बांधव वरचेवर कोळसुंद्यांनी त्यांची दुभती जनावरे मारल्याचे सांगत आहेत. ''रानातला हा जीव पोट भरण्यासाठी गुरा वासरांना मारणारच'', इतपत त्याबाबतचा या लोकांचा स्वीकार आहे. पण हातावरचं पोट असणाऱ्यांचे नुकसान नजरेआड करता येणार नाही. याकडे लक्ष वेधून प्रभुलकर म्हणाल्या, अशीच चर्चासत्रे यापुढेही सह्याद्रीतील विविध पाड्यांवर राबवण्याचे नियोजित आहेत. जेणेकरून मानव-वन्यजीव सहजीवन असंच फुलत, वाढत राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com