जिल्ह्याला 3 हजार 500 मेट्रीक टन खत प्राप्त

जिल्ह्याला 3 हजार 500 मेट्रीक टन खत प्राप्त

जिल्ह्याला ३ हजार ५०० मेट्रीक टन खत प्राप्त

कृषी विभाग ; आठवडाभरात दीड हजार मे. टन खत येणार

रत्नागिरी, ता. १ ः जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० मेट्रीक टन खत पुरवठा उपलब्ध झालेला असून अजून दीड हजार मेट्रीक टन खत आठवडाभरात उपलब्ध होणार आहे. या हंगामासाठी २१ हजार मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली आहे. मॉन्सून तोंडावर आलेला असल्याने खरीप काळात शेतकऱ्यांना वेळेत खत पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत.
खरीप हंगामाच्या तोंडावर खत टंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी कृषी विभागाने यंदा एक महिना पूर्वी नियोजन केले होते. युरिया व डीएपीचा बफर स्टॉक ठेवला जाणार आहे. खतांची कमतरता खरोखरच भासू लागल्यास हा बफर स्टॉक खुला केला जाऊ शकतो. खरीपासाठी २९० मे. टन खताचा बफर स्टॉक ठेवण्याचे नियोजन केलेले आहे. जिल्ह्यातील एकूण खरीप पिकाखालील क्षेत्र सुमारे ८१ हजार ९९५ हेक्टर आहे. खरीप भातपिकाखालील क्षेत्र सुमारे ७० हजार ५७२ हेक्टर, नागली क्षेत्र सुमारे १० हजार २३६ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात गतवर्षी विविध खतांची २२ हजार १४६ मे.टन इतकी मागणी करण्यात आली होती. त्यापैकी शासनाने १४ हजार ६४० मे.टन खत मंजूर केले होते. त्यामानाने यंदा २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी २१ हजार मे.टन खताची मागणी केली आहे. त्यापैकी १३ हजार ७१० मे.टन खत मंजूर झाले आहे. शेताच्या बांधावर खत पोहोचवण्यासाठी तयारी सुरू आहे. खत गुणवत्ता व योग्य वितरण होण्यासाठी तालुक्याच्या कार्यक्षेत्रात भरारी पथक स्थापन केले आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकारी (पथक पमुख), सदस्य म्हणून कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, निरीक्षक वजने मापे, मंडळ कृषी अधिकारी (संबंधित कार्यक्षेत्र), कृषी अधिकारी, पंचायत समिती (सदस्य सचिव) यांचा भरारी पथकात समावेश आहे.
------
चौकट
जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन
बियाणे, खते व कीटकनाशके इत्यादी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने कार्यवाही बाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. या तक्रार निवारण समितीकडून तक्रारीबाबत तातडीने योग्य कार्यवाही होणे आवश्यक आहे. निवारण समितीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी (अध्यक्ष), तालुका कृषी अधिकारी (संबंधित तालुका) सदस्य, कृषी विद्यापीठ प्रतिनिधी (सदस्य), महाबीज प्रतिनिधी, कृषी अधिकारी, पंचायत समिती प्रतिनिधी सदस्य सचिव आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com