पावस-पाचलला धार पवार बांधवभेट मेळावा उत्साहात

पावस-पाचलला धार पवार बांधवभेट मेळावा उत्साहात

फोटो ओळी
-rat१p२५.jpg-KOP२३M०६३७१ पाचल (ता. राजापूर) ः धार पवार बांधव भेट कार्यक्रमात जयेश विश्वासराव यांना नियुक्तीपत्र देताना संस्थेचे पदाधिकारी.


पाचलला धार पवार बांधवभेट मेळावा उत्साहात
पावस, ता. १ ः क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष आणि रत्नागिरी-लांजा-राजापूर प्रभारी तुषारदादा विश्वासराव यांच्या संकल्पनेतून पाचल येथील विद्यानगर येथे भिकाजी पवार यांच्या निवासस्थानी राजापूर, रत्नागिरी व वैभववाडी तालुक्यातील धारपवार बांधवभेट मेळावा उत्साहात झाला.
मेळाव्यासाठी आंबा व्यापारी बाजीराव विश्वासराव, ठाणे येथून सहखजिनदार अमित पवार, सहसचिव सूरज पवार, राजापूर संपर्कप्रमुख जयेश विश्वासराव, रत्नागिरी येथून उपाध्यक्ष राजेंद्र पवार, कोळंबे येथून तालुकाप्रमुख हेमंत पवार, गणपतीपुळे येथून जिल्हाप्रमुख सूरज पवार, लांजा संपर्कप्रमुख संदीप पवार, चिपळूण येथून उपाध्यक्ष सचिन पवार, विवाह संस्थाप्रमुख तुळशीराम पवार, कला क्रीडाप्रमुख प्रदीप पवार, उपाध्यक्ष आणि इतिहास संकलक सनी पवार, चिपळूण शहरप्रमुख गणेश पवार, नीलेश पवार, तालुकाप्रमुख राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. तसेच मिळंद, मूर, केळवली, राजापूर येथूनही बांधव उपस्थित होते. छ. शिवाजी महाराज, कुलदेवता गडकालिका माता आणि महाराजा यशवंतराव यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आजपर्यंत आपण ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती, सभासद नोंदणीची माहिती अमित पवार आणि सूरज पवार यांनी दिली. ट्रस्टची गरज आणि आपला समाज का एकत्र यावा यावर बांधवांशी चर्चा केली. तालुकाप्रमुख विनोद पवार यांनी आपला इतिहास, मानपान ठामपणे लोकांसमोर दाखवा. तसेच कुळ, गोत्र, देवक याबद्दल असलेली तफावत ट्रस्टच्या माध्यमातून दूर करावी असे सुचवले. मोतीराम विश्वासराव यांनी त्यांच्या जोगेश्वरी येथील शाळेबद्दल माहिती देऊन इंग्लिश मिडीयमसाठी शिक्षक म्हणून बांधव भगिनी यांनी लाभ घ्यावा सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com