संगमेश्वर-जहांगीर कलादालनात मिसाळ यांचे चित्र प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर-जहांगीर कलादालनात मिसाळ यांचे चित्र प्रदर्शन
संगमेश्वर-जहांगीर कलादालनात मिसाळ यांचे चित्र प्रदर्शन

संगमेश्वर-जहांगीर कलादालनात मिसाळ यांचे चित्र प्रदर्शन

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१p१.jpg-KOP२३M०६२८८ मुंबई ः येथील जहांगीर कलादालनात सुरू असलेल्या प्रदर्शन उद्गाटन करताना प्रकाश राजेशिर्के, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डीन विश्ववनाथ साबळे आदी.
-rat१p२.jpg- KOP२३M०६२९१मुंबई ः प्रदर्शनात ठेवलेले एकल चित्र.
--------------

जहांगीर कलादालनात मिसाळ यांचे चित्र प्रदर्शन

सह्याद्रि स्कूलचे माजी विद्यार्थी ; कलाकृतींची देश विदेशात विक्री

संगमेश्वर, ता. १ ः सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमधील चित्र-शिल्प-कला महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कलाशिक्षक, कलाप्राध्यापक, कलासमिक्षक, चित्रपट निर्मिती, नामवंत चित्रकार, शिल्पकार अशा अनेक क्षेत्रात आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत. त्यातील एक नामवंत चित्रकार म्हणजे प्रवीण मिसाळ. शास्त्रोक्त शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुक्त कलाकार म्हणून कलानिर्मितीस सुरुवात केली. त्यांच्या अनेक कलाकृतींची देश विदेशात विक्री झाली व त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. सध्या मिसाळ यांचे एकल चित्र प्रदर्शन ''संवेद्य'' या नावाने भारतातील नामवंत जहांगीर कलादालन मुंबई येथे सुरू आहे. ३० मे ते ५ जून या कालावधीत हे प्रदर्शन सुरू राहील.
या प्रदर्शनाच्या उदघाट्नाला सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट चे चेअरमन प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सर जे .जे . स्कूल ऑफ आर्टचे डीन विश्ववनाथ साबळे, माजी प्राध्यापक चित्रकार मधुकर मुंडे, सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश वाघमारे आदी उपस्थित होते. चित्रकार हा संवेदनशील असतो, तो आपल्या संवेदना कलेतून प्रगट करण्याचा प्रयत्न करतो. चित्रकार प्रवीण मिसाळ यांनी देखील रंग, रेषा, पोत यांच्याद्वारे आपल्या मनातील संवेदना चित्रातून उमटविल्या आहेत. चित्र प्रदर्शनाला संवेद्य हे नाव दिले आहे. आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, सौ. पूजा निकम, कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी चित्रकार प्रवीण मिसाळ यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

-------------