रत्नागिरी-आपत्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष

रत्नागिरी-आपत्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष

पान ५ साठी

आपत्कालीन स्थितीत
जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष
महावितरणची खबरदारी; टोल फ्री क्रमांकांचाही समावेश
रत्नागिरी, ता. १ : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीने मदतीसाठी जिल्हास्तरिय नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे.
महावितणच्या कोकण परिमंडळाने पावसाळ्यातील खबरदारी घेतली आहे. वादळी वाऱ्याने वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे, रोहित्र कोसळणे, अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. तेव्हा नागरिकांनी वीज यंत्रणेतील तुटलेल्या तारा, वीज खांबास स्पर्श करणे टाळावे. अशा स्थितीत वीजग्राहकांनी वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. धोकादायक वीज यंत्रणेची सूचना तत्काळ नजीकच्या महावितरणच्या कार्यालयास द्यावी. आपत्काली स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे महावितरणचे आवाहन आहे. आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास संयम राखून सहकार्य करावे. जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७८७५७६५०१८ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ७८७५७६५०१९ हे आहेत. नागरिक व वीजग्राहक आपत्कालीन स्थितीत या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देऊ शकतात. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन विभाग, उपविभाग स्तरावर समन्वयासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२ वा १९१२० वा १८००-२१२-३४३५ वा १८००-२३३-३४३५ या २४ तास सेवेत असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडितची तक्रार ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदविण्याची सोय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com