लांजा- इन्फिगो हॉस्पीटल ग्रुपचे काम सामाजिक जाणिवेचे

लांजा- इन्फिगो हॉस्पीटल ग्रुपचे काम सामाजिक जाणिवेचे

rat०१२६.txt
फोटो ओळी
-rat१p२३.jpg-KOP२३M०६३५४ लांजा : येथे गुरुवारी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या थ्री डी आय क्लिनिकचे फीत कापून उद्घाटन करताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत प्रमोद कदम, डॉ. श्रीधर ठाकूर, मनोहर बाईत, जयवंत शेट्ये, महंमद रखांगी, ॲड. अभिजित जेधे आदी पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करताना डॉ. श्रीधर ठाकूर.


इन्फिगो हॉस्पिटल ग्रुपचे काम सामाजिक जाणिवेचे
मंत्री उदय सामंत ; थ्री डी आय क्लिनिकचे लांज्यात उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १ : केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणीव व भान ठेवून इन्फिगो ग्रुप जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात त्यांनी उभारलेली आरोग्य सुविधाही सामाजिक जाणीव म्हणूनच उभारली आहे. त्यांचे हे काम निश्चितच वाखाणण्याजोगे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या लांजा येथील अत्याधुनिक बाह्यरुग्ण विभागाचा (थ्री डी आय क्लिनिक) प्रारंभ मंत्री सामंत यांच्या करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. मंत्री सामंत इन्फिगोच्या उपक्रमांचे कौतुक केले. आमदार राजन साळवी यांनीही भेट देऊन इन्फिगोचे कौतुक केले. इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तहसीलदार प्रमोद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, जयवंत शेट्ये, महंमद रखांगी, ॲड. अभिजित जेधे आदी उपस्थित होते.
लांजा तालुक्यातील जनतेची मागणी व गरज लक्षात घेऊन इन्फिगो ग्रुपने लांजा क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. लांजा शहरातील मेरिगोल्ड कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे क्लिनिक सुरू करण्यात आले. याप्रसंगी गुरुप्रसाद देसाई, चंद्रकांत परवडी, विलास दरडे, प्रसाद भाईशेट्ये, महेश सप्रे, नितीन कदम, हनीफ नाईक, सुभाष कुरूप, नगरसेवक सचिन डोंगरकर, नगरसेविका वंदना काटगाळकर, मधुरा बापेरकर, सोनाली गुरव, अविराज पाटील, आगार व्यवस्थापिका सौ. पेडणेकर, लीला घडशी, दुर्गेश साळवी, सुभाष गुरव, संदीप सावंत, आत्माराम सुतार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. सौ. श्रुती ठाकूर, दीपक इंदुलकर, मंगेश पावसकर, प्रितेश गुरव, सुशांत पांचाळ, आवेश नाईक, सायली पंडित, अंजली लिमये आदींनी मेहनत घेतली.
------
चौकट १
आमदार साळवींकडून इन्फिगोचे कौतुक
आमदार राजन साळवी यांनीही सदिच्छा भेट देऊन इन्फिगोच्या आरोग्य सेवेच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील इन्फिगोच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. या हॉस्पिटलने येथील आरोग्य सुविधा जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यांनी उभारलेली ही आरोग्य चळवळ निश्चितच वाखाण्याजोगी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com