कुडाळात व्यापारी संघटनेकडून महावितरण अधिकारी धारेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात व्यापारी संघटनेकडून महावितरण अधिकारी धारेवर
कुडाळात व्यापारी संघटनेकडून महावितरण अधिकारी धारेवर

कुडाळात व्यापारी संघटनेकडून महावितरण अधिकारी धारेवर

sakal_logo
By

swt123.jpg
06374
कुडाळः विजेच्या समस्येबाबत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारताना व्यापारी संघटनेचे पदाधिकारी.

कुडाळात व्यापारी संघटनेकडून
महावितरण अधिकारी धारेवर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः शहरात सुरू असलेल्या विजेच्या समस्येबाबत आज तालुका व्यापारी संघटनेकडून एमआयडीसी येथील महावितरण कार्यालयामध्ये धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याबाबत उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांचे लक्ष वेधले. यावेळी व्यापारी संघटनेने पाटील यांच्याशी वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत चर्चा केली.
कुडाळ शहरात होणारे अनियमित आणि अवेळी होणारे भारनियमन, अपुरी कर्मचारी संख्या, पावसाळी नियोजनाचा अभाव, अवास्तव वीज बिले, उशिरा मिळणारी बिले याबाबत व्यापारी संघटनेने उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. यावर अभियंता पाटील यांनी पावसाळी नियोजनाबाबत नगरपंचायतीशी बैठक घेऊन नियोजन केले जाईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीज वाहिन्यांना लागणारी झाडेझुडपे तोडण्यात येतील. लवकरच वरिष्ठ पातळीवर चर्चा करून वीज सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
यावेळी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, सुनील भोगटे, प्रसाद शिरसाट, राजू गवंडे, संदीप महाडेश्वर, राकेश वर्दम, द्वारकानाथ घुर्ये, नितीश महाडेश्वर, तेली, वालावलकर, सावंत, श्याम तेली, भूषण मठकर, अवधूत शिरसाट आदी उपस्थित होते.