रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

पान ५ साठी

रत्नागिरी, लांजात सोमवारी जनता दरबार
रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ५) सकाळी ९ वाजता रत्नागिरीतील अल्पबचत सभागृहात आणि दुपारी १ वाजता लांजा येथील संकल्प सिद्धी सभागृहात (साटवली रोड) येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम ३० जूनपर्यंत
वितरित करा ः पालकमंत्री सामंत
रत्नागिरी ः येथील शिक्षण संस्थामधील महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर येत्या ३० जूनपर्यंत कशा पद्धतीने वितरीत करता येईल, याचे नियोजन संबंधित विभागाने करावे असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शिष्यवृत्ती वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. ते म्हणाले, ‘‘२०२२-२३ या वर्षाकरिता शिष्यवृत्तीची रक्कम जमा आहे. या शिष्यवृतीत ६० टक्के केंद्राचा तर राज्य सरकारचा ४० टक्के वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती न पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या अनुषंगाने १० जूनपर्यंत संस्था चालक, प्राचार्य यांची बैठक घ्यावी अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्ती वाटपाच्या अनुषंगाने गुगलशीटमध्ये सर्व माहिती भरून ती यादी अद्ययावत करावी अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केली. बैठकीसाठी अभिजित हेगशेट्ये, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जे. पी जाधव, सह आयुक्त यादव गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत व्हडे, शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com